अमेरिकेच्या सेनेकडून बगदादी याच्या ठिकाणांवर हल्ला केल्याचा व्हिडिओ प्रसिद्ध (Watch Video)
US Raid On Abu Bakr al-Baghdadi (Photo Credits-Twitter)

अमेरिकेच्या सेनेने बुधवारी अधिकृतरित्या इस्लामिक स्टेट (ISA) च्या अबु बकर अल बगदादी (Abu Bakr al-Baghdadi) याला आंतरराष्ट्रीय नियामांच्या अंतर्गत समुद्रात गाढले. त्याचसोबत त्याच्या ठिकाणांवर कशा पद्धतीने हल्ला केला याचा सुद्धा व्हिडिओ सोशल मीडियात प्रसिद्ध करण्यात आला आहे. व्हिडिओ फुटेजमध्ये काही सैनिक आयएसआय दहशतवादी बगदादी यांच्या ठिकाणावर हल्ला करण्यासाठी कशा पद्धतीने तयारी करत आहेत हे दिसून येत आहे. उत्तर सीरिया मध्ये बगदादी याच्या ठिकाणांवर रेड दरम्यान ब्लॅक अॅन्ड व्हाइट हवाई फुटेज दाखवले आहेत.

अमेरिकेच्या सेंट्रल कमांडचे चीफ जनरल फ्रँन्क मॅकेंजी यांनी सेनेचे कौतुक करत पूर्ण ऑपरेशनबाबत अधिक माहिती दिली आहे. त्यांनी असे म्हटले आहे की, सर्व हल्लेखोरांना आणि उर्वरित लोकांना तेथून काढल्यानंतर बगदादी याच्या ठिकाणी बॉम्ब हल्ला करण्यात आला. परंतु राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी बगदादी हा मरण्याच्या आधी रडत असल्याचे म्हटले आहे. मात्र मॅकेंजी यांनी असे स्पष्ट केले आहे की, बगदादी याची सुरुवातील 3 मुले असल्याचे सांगण्यात आले.त्यानंतर अधिक विश्लेषण केल्यानंतर 2 मुल असून ती 12 वर्षाची असल्याचे सांगण्यात आले.(खात्मा केल्यावर ISIS म्होरक्या बगदादी याच्या मृतदेहाचे अमेरिकेने काय केले?)

Tweet:

शनिवारी संध्याकाळी अमेरिकेच्या सेनेकडून उत्तर पश्चिम सीरियामधील इदलिब प्रांतातील बारिशा गावात बगदादी याच्या ठिकाणांवर हल्लाबोल केला. या कारवाईत बगदादी याच्या ठिकाणांनी घेराव घातल्यानंतर त्याने स्वत:च्या कमरेला विस्फोटक बांधून उडवले.