शुक्रवारी (24 जानेवारी) नायजेरियाच्या Lagos हून व्हर्जिनियातील वॉशिंग्टन ड्युलेस आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे जाणाऱ्या युनायटेड एअरलाइन्सच्या (United Airlines) विमानाने अचानक in-flight movement झाल्याने चार प्रवासी आणि दोन क्रू मेंबर्स जखमी झाल्याचे वृत्त समोर आले आहे. प्रवाशांनी टिपलेल्या या व्हिडिओमध्ये फ्लाइटमधील गोंधळ, ट्रे, खाद्यपदार्थ आणि इतर वस्तू विमानाच्या पडल्याचं दिसून आलं आहे. विमान कंपनीने सांगितले की, Flight 613 ने लागोसमध्ये इमर्जन्सी लँडिंग केले आणि विमानातील सहा जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केले.
युनायटेड एअरलाइन्सचे प्रवक्ते Leslie Scott यांनी सांगितले की त्या सर्वांना घरी सोडण्यात आले आहे. विमानात हा धक्का कशामुळे बसला हे स्पष्ट झालेले नाही. CNNच्या वृत्तानुसार, FlightRadar24 कडील फ्लाइट डेटानुसार, फ्लाइट 613 ने टेकऑफ झाल्यानंतर सुमारे 93 मिनिटांनी cruising altitude वरून अचानक खाली उतरण्यास सुरुवात केली.
फ्लाइटरडारच्या माहितीनुसार, लागोसहून वॉशिंग्टनच्या ड्युलेस आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे जाणारे हेच विमान मंगळवारी वळवण्यात आले होते. विमानाच्या उंचीच्या डेटाने टेकऑफनंतर सुमारे 89 मिनिटांत 1,000 फूट वेगाने खाली उतरल्याचे दिसून आले.
UA613 चे diversions जोडलेले आहेत की नाही हे स्पष्ट नाही. युनायटेड एअरलाइनच्या म्हणण्यानुसार शुक्रवारी या फ्लाइटमध्ये 245 प्रवासी, आठ फ्लाइट अटेंडंट आणि तीन पायलट होते. सीएनएनच्या वृत्तानुसार, एअरलाइनने सांगितले की ते सध्या प्रवाशांना इतर फ्लाइटवर ठेवण्याचे काम करत आहेत.
नायजेरियाच्या नागरी उड्डयन प्राधिकरण (NCAA) मधील सार्वजनिक व्यवहार आणि ग्राहक संरक्षण संचालक मायकेल अचिमुगु यांनी या घटनेची पुष्टी केली आहे, CNN ने सरकारी रेडिओ नायजेरियाचा हवाला देऊन वृत्त दिले आहे.