somalia | Twitter/ANI

अमेरिकेकडून ( USA) सोमालियामध्ये (Somalia) एअर स्ट्राईक करण्यात आला आहे. यामध्ये 30 दहशतवादी ठार झाल्याची माहिती देण्यात आली आहे. इस्लामिक Al-Shabab चे हे दहशतवादी असल्याचं अमेरिकन आर्मीकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान हा एअर स्ट्राईक Galcad शहरापासून 262 किमी दूर झाला आहे. हा भाग राजधानी Mogadishu जवळ आहे. शहरावर ताबा मिळवण्यासाठी मागील काही दिवस सोमाली आर्मी आणि Al-Shabab Militants हे संघर्ष करत होते.

US Africa Command ने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी करण्यात आलेला एअर स्ट्राईक हा 100 पेक्षा अधिक दहशतवाद्यांनी आर्मी वर केलेल्या हल्ल्यानंतरचा आहे. यापूर्वी इस्लामवाद्यांनी गलकाड (Galcad) येथील लष्करी तळावर हल्ला करून सात सैनिकांची हत्या केली होती. सोमालियाच्या माहिती मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, डझनभर अतिरेकी मारले गेले आहेत.

Al-Shabab ही 2006 पासून सोमालियाच्या केंद्र सरकारशी लढत आहे. या लढ्याचा उद्देश अतिरेकी इस्लामी शासन लादण्याचा आहे. मोगादिशू आणि इतर भागातून हाकलल्यानंतर ते लष्कर आणि सर्वसामान्यांवर लक्ष्य करत आहेत.

गेल्या सोमवारी सरकारने दिलेल्या माहितीनुसार, त्यांचे सैन्य आणि स्थानिकांनी (लष्करी प्रशिक्षण असलेले) 2010 पासून al-Shabab चे प्रमुख पुरवठा केंद्र असलेले हरारधेरे (Harardhere) हे बंदर शहर ताब्यात घेतले. यूएस आफ्रिका कमांडने गलकाडशी लढा दिलेल्या अहवालात म्हटले आहे की Al-Shabab ची तीन वाहनं नष्ट करण्यात आली आहेत आणि "कमांडने असे सांगितले आहे की कोणतेही नागरिक जखमी किंवा ठार झाले नाहीत". पण BBC च्या रिपोर्टमध्ये या तपशीलांची स्वतंत्रपणे पडताळणी केलेली नाही. असं स्पष्ट करण्यात आले आहे.

"यूएस आफ्रिका कमांडचे सैन्य भागीदार सैन्याला प्रशिक्षण देणे, सल्ला देणे आणि त्यांना सुसज्ज करणे सुरू ठेवतील जेणेकरून त्यांना जगातील सर्वात मोठे आणि सर्वात घातक अल-कायदा नेटवर्क अल-शबाबला पराभूत करण्यासाठी आवश्यक साधने देण्यात मदत होईल," असे निवेदनात म्हटले आहे.