संपूर्ण जगभरात कोरोना व्हायरस ने हाहाकार माजविला असून यापासून देशाला वाचविण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत. त्यामुळे चीनमधून आलेल्या या महाभयाण व्हायरस ने अक्षरश: सर्व देशांमध्ये थैमान घातले आहेत. याचा सर्वात मोठा फटका बसलाय तो अमेरिकेला. अमेरिकेत (US) गेल्या 24 तासांत 1,433 कोविड बाधितांचा मृत्यू झाला असल्याची धक्कादायक बातमी AFP न्यूज संस्थेने दिली आहे. त्यामुळे आता अमेरिकेत कोविड रुग्णांची एकूण संख्या 7,92, 759 वर पोहोचली आहे.
संपूर्ण जगभराचा विचार केला असता कोरोना व्हायरस रुग्णांची एकूण संख्या 24, 81,287 वर जाऊन पोहोचली आहे. त्यातील 1,70, 436 रुग्णांचा मृत्यू झाला असून 16,63,997 रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहे. हा आकडा खूपच भयानक असून यावरून या देशामध्ये कोरोनाचे मृत्यूचे तांडव काय प्रमाणात सुरु आहे हे दिसतय. Coronavirus: पाकिस्तानमध्ये कोरोना बाधितांची संख्या वाढत असूनही 'रमजान'च्या काळात मशिदी सुरु ठेवण्याचा निर्णय; मौलवींसमोर झुकले सरकार
United States records 1,433 #Coronavirus deaths in past 24 hours: AFP news agency quoting Johns Hopkins
— ANI (@ANI) April 21, 2020
तर स्पेन मध्ये कोरोना बाधितांची एकूण संख्या 2,00,210 वर जाऊन पोहोचली आहे. तर इटलीत 1,81, 228 इतकी कोरोना बाधितांची एकूण संख्या आहे. भारतात कोरोनाबाधित 17656 रुग्ण आणि 559 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 2842 जणांची प्रकृती सुधारुन त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.