Vladimir Zelensky (संग्रहित संपादित प्रतिमा)

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की (Vladimir Zelensky) आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर तब्बल 400 दशलक्ष डॉलर्सचा घोटाळा केल्याचा आरोप आहे. रशियाच्या अधिकृत माध्यम TASS ने अमेरिकन पत्रकाराचा हवाला देत प्रसिद्ध केलेल्या अहवालात हा खुलासा झाला आहे. युक्रेनचे अध्यक्ष आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी डिझेल खरेदीत घोटाळा केल्याचा आरोप या अहवालात करण्यात आला आहे. अहवालानुसार, झेलेन्स्की यांनी किमान $400 दशलक्षचा घोटाळा केला आहे, जो निधी देशाला अमेरिकेने डिझेल इंधन खरेदी करण्यासाठी दिला होता.

अमेरिकन पत्रकार सेमर हर्स यांनी हा रिपोर्ट त्यांच्या वेबसाइटवर अपलोड केला आहे. दुसरीकडे सेंट्रल इंटेलिजन्स एजन्सीनेही आपल्या अहवालात हे मान्य केले आहे की, गेल्या वर्षभरात सुमारे 400 दशलक्ष डॉलर्सचा घोटाळा झाला आहे. मात्र, आतापर्यंत युक्रेनमध्ये कोणताही व्यावसायिक ऑडिट अहवाल जारी करण्यात आलेला नाही. हर्सच्या अहवालात अमेरिकेचे परराष्ट्र सचिव अँटनी ब्लिंकन आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॅक सुलिव्हन यांच्यावरही गंभीर आरोप करण्यात आले आहेत.

पत्रकाराने यूएस सरकारमधील संकटासाठी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटोनी ब्लिंकन आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिव्हन यांना जबाबदार धरले आहे, ज्यामुळे व्हाईट हाऊस आणि गुप्तचर समुदायामध्ये अधिक मतभेद निर्माण झाले आहेत. दोन शीर्ष यूएस मुत्सद्दींनी युक्रेन संघर्षावर ‘तीक्ष्ण विचार आणि राजकीय चातुर्याचा अभाव’ दर्शविला आहे.

दरम्यान, सध्या सुरू असलेल्या रशिया-युक्रेन युद्धात अमेरिका महत्त्वाची भूमिका बजावत असून त्याने युक्रेनला पाठिंबा दिला आहे. रशियाने 24 फेब्रुवारी 2022 रोजी विशेष लष्करी कारवाई सुरू केल्यापासून, युक्रेनला युद्ध संपवण्यासाठी मदत करण्यासाठी अमेरिकेने मोठी भूमिका घेतली आहे. रशिया-युक्रेन युद्धानंतर युक्रेनला अमेरिकेकडून मदत केली जात आहे. (हेही वाचा: Beheading on Camera! रशियन सैनिकांचा क्रुरपणा, युक्रेनियन सैनिकाचा निर्दयीपणे गळा कापला, घटनेचा बनवला व्हिडिओ)

अमेरिकेने युक्रेनला लाखो डॉलर्सची आर्थिक मदत दिली आहे. गेल्या महिन्यातच अमेरिकेने युक्रेनला 350 दशलक्ष डॉलर्सची आर्थिक मदत जाहीर केली होती. युक्रेनला शस्त्रे खरेदी करण्यासाठी ही मदत देण्यात आली होती. युक्रेनला इतर अनेक देशांकडूनही मदत मिळवून देण्यासाठी अमेरिका प्रयत्नशील आहे. युक्रेन-रशिया युद्धानंतर युक्रेनला सुमारे $29 अब्ज आर्थिक मदत मिळाली आहे.