लंडनची महाराणी एलिझाबेझचा नातू आणि ब्रिटनचा प्रिन्स हॅरी (Prince Harry)याने त्याची पत्नी मेगन मार्केल (Meghan) यांनी राजघराण्यातील शाही पद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान प्रिन्स हॅरी आणि मेगन मार्केल यांनी हा निर्णय घेताना आर्थिक स्वरूपात स्वतंत्र होण्यासाठी तसेच उत्तर अमेरिका आणि युकेमध्ये आपला वेळ विभागण्यासाठी हा निर्णय घेत असल्याची माहिती दिली आहे. दरम्यान प्रिंस हॅरी आणि मेगन मार्कल यांनी ही माहिती त्यंच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून जाहीर केली आहे. तर त्यांच्या या निर्णयावर Buckingham Palace कडून देण्यात आलेल्या प्रतिक्रियेमध्ये 'ड्युक आणि डचेस ऑफ स्युसेक्स' (The Duke and Duchess of Sussex) सोबत चर्चा प्राथमिक पातळीवर सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे. प्रिन्स चार्ल्स यांचा नातू Archie साठी मुंबईच्या डब्बेवाल्यांनी खरेदी केलं चांदीचं वळं, चैन आणि हनुमानाचं पेंडण, ब्रिटीश काऊंसिलच्या माध्यमातून देणार भेट.
दरम्यान प्रिंस हॅरी आणि मेगन कडून जारी करण्यात आलेल्या पत्रकामध्ये महाराणी एलिझाबेझ, कॉमनवेल्थ आणि साथीदारांसोबत आपलं कर्तव्य निभावणार असल्याची माहिती दिली आहे. प्रिंस हॅरी याने अमेरिकन अभिनेत्री मेगन मार्कल सोबत मे 2018 मध्ये शाही विवाह केला. त्यानंतर या जोडप्याला लंडनच्या राजघराण्यात 'ससेक्स ऑफ़ ड्यूक आणि डचेस' चा किताब देण्यात आला. मे 2019 मध्ये या जोडप्याच्या आयुष्यात आर्ची (Baby Archie) या चिमुकल्याचं आगमन झाले.
Sussex Royal ची इंस्टाग्राम पोस्ट
मागील काही दिवसांपासून ब्रिटिश मीडियामधून मेगन मार्केलला लक्ष्य करण्यात आलं होतं. याप्रकरणावर प्रिंस हॅरी आणि मेगन मार्केल यांनी नाराजी बोलून दाखवली होती. तसेच संबंधित वृत्तपत्रकावर कायदेशीर कारवाई करणार असल्याचंही त्यांनी बोलून दाखवलं आहे.