two military planes collide In Malaysia PC TWITTER

Malaysia Helicopters Collapse Video: मलेशियात एक मोठी दुर्घटना घडली आहे. मलेशियाच्या सशस्त्र नौदलाच्या दोन हेलिकॉप्टरची हवेत टक्कर झाल्याची माहिती मिळाली आहे. यात १० जणांचा मृत्यू झाला. आज सकाळी लुमुत येथील रॉयल मलेशियन नेव्ही तळावर अपघात झाला. या घटनेचा व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या घटनेनंतर नौदलात शोककळा पसरली आहे. टक्कर इतकी भीषण होती की, दोन्ही विमान खाली कोसळले.(हेही वाचा-अमेरिकेतील ॲरिझोना येथे कार अपघातात 2 भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू)

मिळालेल्या माहितीनुसार, मलेशियाच्या रॉयल मलेशियन नेव्हीच्या वार्षिक कार्यक्रमाच्या तालीमीच्या दरम्यान दोन्ही लष्करी हेलिकॉप्टरची टक्कर झाली आहे. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे. स्थानिक वृत्तवाहिन्यांच्या प्राथमिक माहितीनुसार, या दोन्ही हेलिकॉरप्टरमधील सर्व जण अपघातात दगावले आहे.  M503-3 मेरीटाइम ऑपरेशन्स हेलिकॉप्टर (HOM) मध्ये सात कर्मचारी होते, तर इतर, M502-6 मध्ये तीन सदस्य होते. येत्या 3 ते 5 मे दरम्यान होणाऱ्या नौदल दिनानिमित्त दोन्ही हेलिकॉप्टर तयार करण्याचे प्रशिक्षण घेत होते त्यावेळीस अपघात घडला.

गेल्या वर्षी मलेशियामइमध्ये इमर्जन्सी लॅंडिगदरम्यान हेलिकॉप्टर कोसळले होते. मात्र, या घटनेतून सर्व जण सुखरुप बचावले. याही घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.