Twitter, TikTok (Photo Credits: File Photo)

चायनीज व्हिडिओ शेअरिंग अॅप (Chinese Video Sharing App) टिकटॉक (TikTok) सोबत विलीनीकरणाबाबत ट्विटरने चर्चा सुरु केली असल्याची माहिती समोर येत आहे. भारतानंतर आता अमेरिकेने देखील राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणास्तव टिकटॉकवर बंदी घातली आहे. या दरम्यान ट्विटर टिकटॉक खरेदी करण्याच्या तयारीत असल्याचे समोर आले होते. परंतु, टिकटॉक सह संलग्न होणे ट्विटरसाठी इतके सोपे नसल्याचे बोलले जात आहे. रिपोर्ट्सनुसार, 29 बिलियन डॉलरची कंपनी विकत घेण्यासाठी ट्विटरला (Twitter) यासाठी दुसऱ्या गुंतवणूकदारांचे साहाय्य घ्यावे लागेल.

टिकटॉक खरेदीसाठी मायक्रोसॉफ्ट कंपनीला इंटरेस्ट असल्याचे बोलले जात आहे. यासाठी बिजिंग मधील बायटडान्स लिमिटेड चे टिकटॉकच्या मालकांसह गेल्या काही आठवड्यांपासून चर्चा सुरु आहे. मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला यांनी देखील टिकटॉक खरेदी विषयी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी चर्चा केली आहे. दरम्यान बाजारात सुरु असलेल्या उलट सुलट चर्चेबद्दल कंपनीने मौन पाळणे पसंत केल्याचे टिकटॉकच्या प्रवक्तांनी सांगितले आहे.

ट्विटरचे बाजार भांडवल 29 बिलियन डॉलर असून ते मायक्रोसॉफ्टपेक्षा 1.6 ट्रिलियन डॉलरने कमी आहे. त्यामुळे टिकटॉक खरेदी करण्यासाठी नक्कीच ट्विटरला इतर गुंतवणूकदारांची मदत लागणार आहे. (अमेरिकेमध्ये TikTok, WeChat वर बंदी; US President Donald Trump प्रशासनाकडून व्यवहार बंद करण्याला 45 दिवसांची मुदत)

रिपोर्टनुसार, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चायनीज कंपन्यांना अमेरिकेतून काढून टाकण्यासाठी 45 दिवासंची मूदत दिली होती. या घोषणेनंतर टिकटॉकचे युएसमधील भवितव्य धोक्यात आले होते. राष्ट्राध्यक्षांच्या या आदेशानंतर आम्ही खूप धक्क्यात आहोत आणि हा आदेश कुठल्याही प्रोसेसशिवाय देण्यात आला असे टिकटॉक अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.