Elon Musk | (Photo Credits: Archived, Edited, Symbolic Images)

जगप्रसिद्ध सोशल नेटवर्किंग आणि मायक्रोब्लॉगिंग संकेतस्थळ ट्विटर (Social Networking and Microblogging Website Twitter ) खरेदी केल्यानंतर या कंपनीचा नावा मालक एलन मस्क (Twitter CEO Elon Musk) यांच्याकडून निर्णयांचा धडाका लावला जात आहे. यात ट्विटर अकाऊंट व्हेरीफाय करण्यासाठी 'ब्लु टीक' मिळविण्यासाठी पैसे आकारण्याच्या निर्णयासह ट्विटरने नुकताच आपल्या 7,500 कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकण्याच्या निर्णयाचाही समावेश आहे. या 7500 कर्मचाऱ्यांमध्ये जवळपास 250 भारतीय कर्मचारी असल्याची माहिती आहे. कर्मचाऱ्यांना एकाच वेळी इतक्या मोठ्या प्रमाणावर कामावरुन काढून टाकल्यामुळे कर्मचारी वर्गांमध्ये तीव्र नाराजी आहे. या नाराजीवर ट्विट करत एलन मस्क (Elon Musk) यांनी आपली भूमिका व्यक्त केली आहे.आपल्या निर्णयाचे समर्थन करत मस्क यांनी म्हटले आहे की, 'दुर्दैवाने कोणताही पर्याय नाही'. कंपनी दिवसेंदिवस अधिकच तोटा सहन करत आहे. कंपनी सोडणाऱ्या प्रत्येकाला 3 महिन्यांच्या विच्छेदाची (Severance) ऑफर देण्यात आली होती, जी कायद्याने ठरवून दिलेल्या नियमापेक्षा 50% जास्त आहे

ट्विटर खरेदी केल्यानंतर नवीन मालक एलोन मस्क यांनी त्यांच्या ब्लॉकबस्टर टेकओव्हरच्या अवघ्या एका आठवड्यानंतर अडचणीत असलेल्या कंपनीत मोठे फेरबदल सुरू केले. दरम्यान, ट्विटरचे नवे प्रमुख इलॉन मस्क यांनी कंपनीच्या जवळपास 50% कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याच्या त्यांच्या हालचालीचा बचाव केला आहे. बचावात्मक ट्विटमध्ये मस्क यांनी म्हटले आहे की, अनेक जाहिरातदारांनी ट्विटरवर जाहिरात खर्च प्रलंबीत ठेवल्याने कंपनी तोट्यात चालत आहे. (हेही वाचा, Layoffs at Twitter: पराग अग्रवाल यांच्यानंतर Elon Musk 3000 कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याच्या तयारीत)

फोक्सवॅगन एजी, जनरल मोटर्स, फायझर इंक आणि युनायटेड एअरलाइन्स हे प्रमुख ब्रँड आहेत ज्यांनी ट्विटरवर आधीच त्यांच्या जाहिराती थांबवल्या आहेत. मस्कने गेल्या आठवड्यात कंपनीचा ताबा घेतल्यानंतर आणि सामग्री नियंत्रणासह मोठ्या प्रमाणात इतर बदल केल्यानंतर ट्विटरवर खर्च चालू ठेवायचा की नाही हे ठरवण्यासाठी कंपन्यांवर दबाव वाढत आहे.

ट्विट

दरम्यान, गेल्या आठवड्यात सोशल मीडिया कंपनीचा ताबा घेण्याआधी, मस्कने जाहिरातदारांना वचन दिले की ते ट्विटरला “free-for-all hellscap” बनू देणार नाहीत. हिंसेविरुद्धच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर, कोरोनासारख्या महामारीबद्दल चुकीची माहिती पसरवणाऱ्यांवर ट्विटरवर चाप लावला जाईल.