Photo Credit - x

Turkey Cable Car Crash: दक्षिण तुर्कीतील डोंगराळभागात शुक्रवारी केबल कारची ट्रॉली एका खांबावर आदळीन अपघात झाल्याची घटना घडली. या अपघातात एकाचा मृत्यू झाला. तर 10 जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. परिणामी संपूर्ण केबव कार प्रणाली ठप्प पडली. त्यामुळे तब्बल २५ केबल कार मधील १७४ जण रात्रभर हवेत अडकले होते. सुदैवाने ते सर्व सुखरूप आहेत. बचाव कार्य यशस्वी रितया पार पडताच 'यशस्वी बचाव कार्यात 174 जणांना वाचवण्यात यश आले' अशी पोस्ट तुर्कीचे मंत्री अली येरलिकाया यांनी शनिवारी दुपारी एक्सवर केली. (हेही वाचा :Israel Iran Tension: इराणच्या हल्ल्यानंतर इस्रायलने शैक्षणिक संस्था केल्या बंद )

174 जणांच्या बचावकार्यासाठी 10 हेलिकॉप्टर आणि 607 हून अधिक बचाव कर्मचारी सहभागी झाले होते. 23 तास हे बचावकार्य चालले. जेव्हा ट्रॉली एका खांबाला आदळली तेव्हा त्यातील प्रवासी खाली पडले आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला.

13 जणांना ताब्यात घेण्याचे आदेश

रॉयटर्सच्या वृत्तानुसार, तुर्कीचे न्यायमंत्री तुंक यिलमाझ यांनी सांगितले की, या प्रकरणात केबल कार चालवणाऱ्या खासगी कंपनीच्या अधिकाऱ्यांसह १३ जणांना ताब्यात घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत.