Israel Iran Tension: इराणच्या हल्ल्यानंतर इस्रायलने शैक्षणिक संस्था केल्या बंद
Israeli PM Netanyahu

Israel Iran Tension: इराणच्या हल्ल्यानंतर इस्रायलने रविवारपासून आपल्या सर्व शैक्षणिक संस्था अनिश्चित काळासाठी बंद केल्या आहेत. इराणने शनिवारी इस्रायलवर ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी हल्ला केला. त्यांना हवेत नष्ट करण्याचा दावा इस्रायलने केला आहे. सीरियातील दमास्कस येथील वाणिज्य दूतावासावर इस्रायलच्या संरक्षण दलाने (आयडीएफ) 1 एप्रिल रोजी केलेल्या हल्ल्यानंतर इराण इस्रायलवर हल्ला करण्याची धमकी देत ​​आहे. या हल्ल्यात ब्रिगेडियर जनरल मोहम्मद रझा जाहेदी यांच्यासह इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्स कॉर्प्स (IRGC) चे सात अधिकारी मारले गेले.

आयडीएफचे प्रवक्ते रिअर ॲडमिरल डॅनियल हगारी यांनी शनिवारी रात्री एका निवेदनात सांगितले की, रविवारपासून कोणतीही शैक्षणिक संस्था उघडणार नाही आणि कोणतेही शिबिर कार्यक्रम किंवा अतिरिक्त क्रियाकलाप होणार नाहीत. डॅनियल हागारी यांनी इस्त्रायली नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहनही केले आहे.