जगभरात जून महिना हा ‘प्राईड मंथ’ (Pride Month) म्हणून साजरा केला जातो. एलजीबीटीक्यू+ (LGBTQ+) समुदायासाठी हा गर्वाचा, अभिमानाचा महिना आहे. शनिवारी (10 जून, 2023) अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे निवासस्थान असलेल्या व्हाईट हाऊस (White House) येथे प्राईड मंथच्या निमित्ताने समलिंगींच्या सन्मानार्थ एका खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राष्ट्राध्यक्ष जो बिडेन (Joe Biden) यांनी एलजीबीटीक्यू+ लोकांना पाठींबा दर्शवला. अनेक अर्थांनी हा कार्यक्रम अतिशय खास ठरला. आता या कार्यक्रमातील एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ट्रान्सजेंडर मॉडेल आपला टॉप काढताना दिसत आहे. इतकेच नाही तर तिने कॅमेऱ्यासमोर आपले प्रायव्हेट पार्टसदेखील दाखवले आहेत.
तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांच्याबद्दल एक खुलासा झाला होता की, अनेकदा ते नग्न पोहायला जायचे, ज्यामुळे महिला कर्मचाऱ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत होते. याच गोष्टीचा संदर्भ घेत रोझ मोंटोया या ट्रान्सजेंडर मॉडेलने व्हाईट हाऊसमध्ये तिचा टॉप काढला आणि स्वतःची वक्षस्थळे दाखवणारा व्हिडिओ बनवला. व्हिडीओमध्ये ही महिला अभिमानाने आपली वक्षस्थळे दाखवताना दिसत आहे. बिडेन जसे नग्न होऊ शकतात तसेच आपणही नग्न होऊ शकतो हाच संदेश तिला यातून द्यायचा होता.
This is what happened at the White House pride event. A disgrace to our country. pic.twitter.com/QmXVIdmOPr
— Libs of TikTok (@libsoftiktok) June 13, 2023
जुलै-ऑगस्ट 2014 मध्ये, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन हे आंघोळीचा सूट न घालता पोहायला जातात असे एका पुस्तकात उघड झाले होते. ही बाब ते राष्ट्रपती होण्यापूर्वीची आहे. त्या काळात ते अमेरिकेचे उपराष्ट्रपती होते आणि अध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी दावा ठोकत होते. रोनाल्ड केसलर यांनी लिहिलेल्या 'द फर्स्ट फॅमिली डिटेल' या पुस्तकात असे सांगण्यात आले आहे की, जो बिडेन वॉशिंग्टन डीसीमधील उपराष्ट्रपतींच्या निवासस्थानी आणि डेलावेअरमधील त्यांच्या घरीही पूर्णतः नग्न होऊन पोहतात.
या पुस्तकात अनेक स्त्रोतांचा हवाला देऊन हे खुलासे केले गेले आहेत. पुस्तकात असेही म्हटले आहे की, सीक्रेट सर्व्हिसच्या महिला कर्मचाऱ्यांना जो बिडेन नग्न पोहताना खूप त्रास व्हायचा. अनेकवेळा बिडेन अचानक डेलावेअरला जाण्याचा बेत आखत असत, यामुळे एजंटही वैतागले होते. (हेही वाचा: मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे Pune Pride March मध्ये सहभागी; म्हणाले- 'LGBTQIA+ समुदायाच्या अस्तित्वाचा स्वीकार, हाच लोकशाहीचा खरा सन्मान')
दरम्यान, जून 2023 मध्ये जगभरातील ट्रान्सजेंडरदेखील 'प्राइड मंथ' साजरा करतात. जो बिडेनच्या प्रशासनाने 10 जून रोजी ट्रान्सजेंडर्सना व्हाईट हाऊसच्या दक्षिण लेनमध्ये आमंत्रित केले होते. या समारंभास मोठ्या संख्येने LGBTQ+ लोक उपस्थित होते. समलैंगिकांनी जो बिडेन आणि फर्स्ट लेडीसोबत सेल्फीही काढले. यावेळी जो बिडेन यांनी 'हॅपी प्राइड मंथ, हॅपी प्राइड इयर, हॅपी प्राइड लाइफ' म्हणत LGBTQ+ यांना प्रोत्साहन दिले. या सोहळ्याला व्हाईट हाऊसमधील आजवरचे सर्वात मोठे 'प्राइड सेलिब्रेशन' म्हटले जात आहे.