Costly Divorce: 'हे' आहेत जगातील सर्वात महागडे 5 घटस्फोट, खर्च पाहून उडेल झोप
Jeff Bezos With Wife (Photo Credits: Twitter/ @Jeffbezos)

जगात अशीही काही घटस्फोट झाली आहेत, ज्यांनी अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहेत. या घटस्फोटात लाखो-कोटी रुपये पाण्यासारखे खर्च झाले आहेत. मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स आणि पत्नी मेलिंडा गेट्स यांनी लग्नाच्या 27 वर्षानंतर घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. घटस्फोटाची घोषणा करताना दोघांनीही संयुक्त निवेदन जारी केले होते की, घटस्फोटानंतरही ते एकमेकांसोबत व्यावसायिकरित्या काम करत राहतील. या दोघांचा घटस्फोट हा देखील जगातील सर्वात महागड्या घटस्फोटापैकी एक असू शकतो. तर, जगात सर्वात महागडा घटस्फोट कोणता? हे या लेखात जाणून घेऊया. हे देखील वाचा-

जेफ बेजॉस- मॅकेन्जी

जगातील सर्वात महाग घटस्फोटाच्या यादीत अमेझॉन कंपनीचे मालक जेफ बेजॉस अव्वल स्थानी आहेत. जेस बेजॉस आणि मॅकेन्जी यांनी जवळपास 25 सोबत राहिल्यानंतर घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यांच्या घटस्फोटावर तब्बल 242 लाख कोटी रुपये म्हणजे 3500 कोटी डॉलर खर्च झाले होते.

एलक वाइल्डेंस्टीन और जॉसलीन

फ्रेंच-अमेरिकन उद्योगपती, आर्ट डीलर आणि रेसहॉर्सचे मालक एल्क वाइलेन्स्टाईन आणि जोसलिन यांचाही जगातील सर्वात महागड्या घटस्फोटाच्या यादीत नाव आहे. त्यांनी 21 वर्षे एकत्र राहिल्यानंतर 1999 मध्ये विभिक्त होण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या घटस्फोटात तब्बल 26.3 लाख कोटी रुपये म्हणजे 380 कोटी खर्च झाले होते.

रूपर्ट मर्डोक- ऐना

मीडिया मोगल रूपर्ट मर्डोक आणि पत्रकार ऐना यांनी जवळजवळ 31 वर्षे सोबत राहिल्यानंतर विभिक्त होण्याचा निर्णय घेतला. या जोडप्याने 1999 मध्ये घटस्फोट घेतला. या घटस्फोटाचे प्रकरणी 11.8 कोटी म्हणजेच 170 कोटी रुपयांत निकाली लागले होते.

बर्नी एक्लेस्टोन- स्लाव्हिका

ब्रिटनमधील सर्वात श्रीमंत लोकांपैकी बर्नी एक्लेस्टोन आणि स्लाव्हिका यांनी जवळजवळ 23 वर्षे विवाहित जीवन एकमेकांसोबत घालविल्यानंतर घटस्फोट घेतला. या दोघांचे 2009 मध्ये घटस्फोट प्रकरण जवळपास 8.3 लाख कोटी रुपये म्हणजे १२० दशलक्ष डॉलर्सवर निकाली निघाले होते.

स्टीव्ह वेन आणि एलेन

अमेरिकन रिअल इस्टेट बिझनेसमन आणि आर्ट कलेक्टर स्टीव्ह वीन आणि त्यांची पत्नी एलन यांचे घटस्फोटही चर्चेत आले होते. या दोघांनी दोनदा लग्न केले होते. हे दोघांनी पहिल्यांदा 1963 ते 1986 मध्ये लग्न केले होते. त्यानंतर दुसऱ्यांदा 1991 ते 2010 पुन्हा लग्न केले. परंतु, 2010 साली घटस्फोटाचा निर्णय घेतला होता. तेव्हा सुमारे 9.9 लाख कोटी रुपये म्हणजेच 100 कोटी खर्च झाले होते.

हे जगातील सर्वात महाग आणि अव्वल 5 महागडे घटस्फोट आहेत, जे बर्‍याच चर्चेत राहिले होते. या महागड्या घटस्फोटाची प्रकरणे निकाली काढण्यासाठी लाखो कोटी रुपये खर्च करण्यात आले होते.