Afghanistan-Taliban Conflict News: अफगाणिस्थानात तालिबानांच्या दहशतीला सुरुवात, आंदोलनकर्त्यांवर केला गोळीबार, यात 2 ठार तर 12 जण जखमी
Taliban. (Representational Image/ Photo Credit: PTI)

अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan) तालिबानने (Taliban) आपली दहशत दाखवायला सुरुवात केली आहे. अफगाणिस्तानच्या नांगरहार प्रांतात तालिबानचे क्रूर कृत्य समोर आले आहे. येथे त्यांनी विरोध करणाऱ्या लोकांवर गोळीबार (Firing) केला आहे. ज्यात दोन लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 12 जण जखमी झाले आहेत. हे करून त्यांनी पुन्हा एकदा आपला जुना चेहरा जगासमोर आणला आहे. असे सांगितले जात आहे की तालिबानने देशाच्या ध्वजाच्या (Flag) अपमाना विरोधात आंदोलन (agitation) करणाऱ्यांवर गोळीबार केला. तालिबान्यांनी राष्ट्रध्वजाच्या जागी त्यांचे स्वतःचे पांढरे झेंडे लावले आहेत. विरोध करणाऱ्या लोकांनी तालिबानला आवाहन केले आणि त्यांनी सांगितले की त्यांनी देशाच्या ध्वजाचा अपमान करू नये. पण तालिबानने त्याचे ऐकले नाही आणि त्याच्यावर गोळीबार सुरू केला.

प्रांतातील सुरख रोड परिसरातील ही घटना सांगितली जात आहे. घटनेच्या वेळी मोठी गर्दी झाली होती. त्यानंतर गोंधळ उडाला आणि लोक रस्त्यावर धावू लागले. आदल्या दिवशी तालिबानने शांतता राखण्याचे बोलले होते आणि दुसऱ्या दिवशीच अशांतता पसरवायला सुरुवात केली आहे. धवारी जलालाबादमध्ये स्थानिकांनी तालिबानच्या विरोधात निदर्शने करत होते. तिथे तालिबानने आंदोलकांवर गोळीबार केल्याचे सांगितले जात आहे. हेही वाचा All About Taliban: तालिबान काय आहे? तालिबानी संघटन, स्थापना, ओसामा बीन लादेनची एण्ट्री आणि अफगान जनतेची फरफट

तालिबान्यांनी निशस्त्र लोकांवर अनेक राऊंड गोळ्या झाडल्या. तर लोक फक्त ध्वजाबद्दल शांततेने आपला मुद्दा मांडत होते. पूर्वी अफगाणिस्तानात तालिबानचे राज्य होते, तेव्हाही अशा बातम्या येत असत. तालिबानचे प्रवक्ते अर्थातच जगासमोर आले आणि म्हणाले की हा तालिबान पूर्वीपेक्षा वेगळा आहे आणि त्याला कोणत्याही प्रकारचे वैर नको आहे. पण त्याचे लढाऊ खुलेआम रस्त्यावर शस्त्रे घेऊन फिरत आहेत आणि सामान्य लोकांना लक्ष्य करत आहेत, यामुळे लोकांमध्ये खूप भीती आहे.

तालिबानच्या आगमनामुळे लोक खूप घाबरले आहेत आणि देशापासून पळून जात आहेत. गर्दी पाहून अमेरिकन सैनिकांनी काबूल विमानतळावर गोळीबारही केला, त्यात पाच जणांचा मृत्यू झाला. मात्र या लोकांच्या मृत्यूच्या कारणाबाबत कोणतीही अधिकृत माहिती नव्हती. त्याच वेळीअमेरिकन विमानात चढलेल्या तीन लोकांचा त्यावरून पडून मृत्यू झाल्याचे समोर आले होते.