तालिबानची अमेरिकेला चेतावणी, 31 ऑगस्ट पूर्वी अफगाणिस्तानमधून सेनेला खाली करण्याचे आदेश
Joe Biden | (Photo Credits: Facebook)

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन (Joe Biden)  यांनी असे म्हटले की, अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan) सैनिकांना परत आणण्याचे मिशन 31 ऑगस्ट पर्यंत पूर्ण होणार होते. त्यानंतर सैनिकांच्या तैनातीबद्दल पुढे चर्चा होणार होती. मात्र हे प्रकरण आता अधिकच चिघळत चालल्याचे दिसून येत आहे. स्थानिक मीडियाच्या मते, तालिबानने अमेरिकेला स्पष्ट शब्दात धमकी दिली आहे. तालिबानचे प्रवक्ता सोहेल शाहीन यांनी एक विधान जाहीर करत असे म्हटले आहे की, जर अमेरिकेने आपल्या सैनिकांना परत बोलावण्यास वेळ लावल्यास तर याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील. अमेरिकेच्या सैन्याने 31 ऑगस्ट पूर्वी माघार घेतली नाही तर याचे परिणाम गंभीर होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

न्यूज एजेंसी सिन्हुआ यांच्या रिपोर्ट्सनुसार, रविवारी दुपारी व्हाइट हाउसमध्ये पत्रकारांना संबोधित करत बिडेन यांनी अमेरिकेतील सैनिकांच्या परतण्यासंदर्भात अपडेट्स दिले. त्याचसोबत बिडेन यांना 31 ऑगस्टचा कालावधी जवळ येत असल्यासंदर्भात विचारले असता त्यांनी म्हटले की, आमच्या आणि सेनेच्या विस्ताराबद्दल चर्चा सुरु आहे. आम्ही अपेक्षा करतो की, आम्हाला विस्तार करावा लागणार नाही.(Afghanistan-Taliban Conflict: काबूल आंतरराष्ट्रीय विमानतळावर चेंगराचेंगरीत 7 जण ठार, अफगाणिस्थानातून बाहेर पडण्याचा करत होते प्रयत्न)

जुलै मध्ये बिडेन यांनी अमेरिकेच्या सेनेला या महिन्याच्या अखेर पर्यंत अफगाणिस्तानतून आपले मिशन संपवण्याचे आदेश दिले होते. तालिबानने 15 ऑगस्ट रोजी राजधानी काबुल मध्ये प्रवेश करत अमेरिकेतील प्रत्येकाला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करत आहेत. बिडेन यांनी असे म्हटले की, अमेरिकेच्या सेनेने गेल्या 24 तासात जवळजवळ 3900 कर्मचाऱ्यांना बाहेर काढले आहे.