Taliban. (Representational Image/ Photo Credit: PTI)

अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan) समलैंगिक शारीरिक संबंधांची (Homosexual Sexual Relations) प्रकरणे झपाट्याने वाढत असलेली दिसत आहेत. मात्र आता अफगाण तालिबानच्या (Taliban) पुरुषांवरील प्रेमाचा नकारात्मक परिणाम दिसून येऊ लागला आहे. तालिबानी लढवय्यांमध्ये एचआयव्ही एड्सची लागण झालेल्यांची संख्या वाढू लागली आहे. एड्सची वाढती प्रकरणे पाहता प्रशासनाने अंतर्गत चौकशीचे आदेशही दिले आहेत. याबाबत तालिबान हायकमांडने आपल्या सर्व लोकांना तोंडी सूचना दिल्या आहेत की, कोणाशीही शारीरिक संबंध ठेवण्यापूर्वी त्यांची वैद्यकीय तपासणी करावी.

काबूलमध्ये काही तरुण मुलांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, तर काहींनी आत्महत्याही केली तेव्हा ही बाब समोर आली. चौकशीदरम्यान या मुलांचे तालिबानच्या सदस्यांनी अपहरण करून त्यांना कैदेत ठेऊन त्यांच्याशी शारीरिक संबंध ठेवल्याचे उघड झाले. काही महिन्यांनंतर ही मुले घरी परतली तेव्हा त्यांना एचआयव्ही एड्स झाल्याचे निष्पन्न झाले.

तालिबान प्रशासनाने गुप्तपणे काही ठिकाणी छापे टाकले, जेथे दोन मुले तळघरात बंद असल्याचे आढळले. या मुलांशी दोन डझनहून अधिक तालिबानी एक आठवड्याहून अधिक काळ शारीरिक संबंध ठेवत होते. या दोन्ही मुलांमध्ये एचआयव्ही एड्सही आढळून आला. तालिबान प्रशासनाने तेथे उपस्थित असलेल्या सर्व तालिबानी सैनिकांची वैद्यकीय चाचणी केली असून, हा अहवाल गोपनीय ठेवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. यानंतर तालिबान प्रशासनाने आपल्या सर्व सैनिकांना भविष्यात कोणत्याही प्रकारच्या समस्येला सामोरे जावे लागू नये यासाठी खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. (हेही वाचा: Taliban Official Gay Sex: तालिबानी अधिकाऱ्याचे बॉडीगार्डसोबत 'समलैंगिक संबंध'; सेक्स करतानाचा व्हिडिओ व्हायरल)

दरम्यान, याआधी एक व्हिडीओ समोर आला होता ज्यामध्ये तालिबानचा एक वरिष्ठ अधिकारी आणि दा अफगाणिस्तान ब्रेश्ना शेरकत (DABS) चा प्रमुख मुल्ला अहमद अखुंद त्याच्या 21 वर्षीय अंगरक्षकासोबत समलैंगिक संबंध प्रस्थापित करताना दिसत होता. पूर्वीचे सरकार पडल्यानंतर 2021 मध्ये तालिबानने अफगाणिस्तानचा ताबा घेतला. तालिबानच्या राजवटीत, समलैंगिक संबंध हे स्लामिक (शरिया) कायद्याच्या विरोधात असल्याचे मानण्यात आले आहे व समलैंगिकांना मृत्यूदंडाची शिक्षा आहे.