 
                                                                 Surgical Strike 2: भारतीय वायूसेनाने पाकिस्तानवर (Pakistan) हल्ला केल्यानंतर त्यांचा थरकाप उडाला आहे. त्यामुळे मंगळवारी (26 फेब्रुवारी) पाकिस्तान संसदेत याबद्दल संताप पाहायला मिळाला. तर पंतप्रधान इम्रान खान यांच्या विरोधात खासदारांनी घोषणा केल्या आहेत. तर 'शेम-शेम' म्हणत भारताने आपले नाक कापल्याची नाराजी संसदेत पाहायला मिळाली.
इम्रान खान (Imran Khan) यांच्या विरोधात आज संसदेत विरोधी पक्षांकडून टीका करण्यात आली. तसेच खान यांच्या सरकाच्या धोरणामुळे आपले नाक कापले गेल्याची खंत खासदारांनी संसदेत व्यक्त केली आहे. तर पाकिस्तान सरकारच्या परराष्ट्र धोरणांची खिल्ली उडवत खासदारांनी खान यांनी दोन दिवसात खुशखबर येईल असे म्हटले होते. मात्र त्याचे परिणाम उलटे झाल्याचा सवाल इम्रान खान यांना विचारण्यात आला आहे.(हेही वाचा-Surgical Strike 2: बालाकोट येथे मसूद अजहरच्या जवळीक नातेवाईकाचा मृत्यू, मोठ्या संख्येने दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश)
तर संसदेत खासदारांनी भारताला आता उत्तर द्या अशी मागणी केली आहे. परंतु कागदी निंदा किंवा निषेध व्यक्त करुन काही होणार नसल्याचे खासदारांनी संसदेत म्हटले आहे.
 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                     
                     QuickLY
                                                                                QuickLY
                                     Socially
                                                                                Socially
                                     
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                     
                     
                     
                     
                                 
                                 
                                 
                                 
                                 
                                
