भारतीय वायुसेनेने (Indian Air Force) मंगळवारी (26 फेब्रुवारी) पाकिस्तानात (Pakistan) घुसुन पुलवामाच्या भ्याड हल्ल्याचे प्रतिउत्तर दिले आहे. वायुसेनेने बालाकोट, चकोठी आणि मुजफ्फराबाद येथील दहशतवाद्यांच्या प्रशिक्षण देण्यात येणाऱ्या तळांवर हल्ला केला. यामध्ये बालाकोट येथे केलेल्या हल्ल्यात जैश-ए-मोहम्मद दहशतवादी संघटनेचा मुख्य मसूद अजहर (Masood Azhar) याचा जवळीक नातेवाईक अजहर युसुफ उर्फ उस्ताद गौरी (Ustaad Gohri) मारला गेला आहे
भारतीय विदेश सचिव विजय गोखले यांनी संवाददात्यांना सांगितले की, बालाकोट मध्ये जैश-ए-मोहम्मद संघटनेचे प्रशिक्षण देणारे तळ असल्याची माहिती मिळाली होती.त्याचसोबत येथे मोठ्या प्रमाणात दहशतवादी असल्याचे ही समजले होते. तसेच मसूद अजहरचा नातेवाईक अजहर हा हे प्रक्षिणाचे तळ चालवत असल्याची ही माहिती मिळाली होती. अजहर 1999 मधील भारतीय विमान आईसी 814 च्या अपहरणात सामिल होता. तर अजहर विरुद्ध भारतात अपहरण आणि हत्या केल्याचे गुन्हे दाखल आहेत.(हेही वाचा- घाबरलेल्या पाकिस्तानचे लोटांगण: शांततेसाठी एक संधी द्या, भारताने पुरावे दिल्यास तत्काळ कारवाई करु: इमरान खान)
JeM's Yusuf Azhar alias Mohammad Salim alias Ustaad Gohri who was targeted today by IAF #airstrike in Balakot across LOC was on the Interpol list and among the most wanted in India. pic.twitter.com/1eTj8FhFMJ
— ANI (@ANI) February 26, 2019
भारतीय लष्कराने केलेल्या कारवाईत सुमारे 200 दहशतवादी ठार झाले. भारतीय जनतेच्या मनात जे होते तेच भारतीय लष्कराने केल्याची भावना देवेंद्र फडणवीस यांनी या वेळी व्यक्त केली. तसेच, देशावर होणारे सर्व प्रकारचे हल्ले परतवून लावण्यात भारत सक्षम आहे. भारतीय लष्कराच्या शक्तीबाबत मला अभिमान असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.