Earthquake in Indonesia: इंडोनेशिया (Indonesia) मध्ये आज भूकंपाचे (Earthquake) जोरदार धक्के बसले. पूर्वेकडील उंच प्रदेशातील पापुआ प्रांतात आज सकाळी 5.7 रिश्टर स्केल (Richter Scale) तीव्रतेचा भूकंप झाला. मात्र, भूकंपानंतर सुनामीचा इशारा देण्यात आलेला नाही. इंडोनेशियाच्या हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, स्थानिक वेळेनुसार सकाळी 7:11 वाजता भूकंप झाला. भूकंपाचा केंद्रबिंदू यालिमो रीजन्सीच्या ईशान्येस 68 किलोमीटर आणि पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 78 किलोमीटर खाली होता.
सिन्हुआ वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, भूकंपामुळे प्रचंड लाटा उसळण्याची शक्यता नाही. त्यामुळे त्सुनामीचा इशारा देण्यात आलेला नाही. (हेही वाचा -Earthquake In Khandwa: मध्य प्रदेशातील खंडवा येथे भूकंपाचे धक्के; 3.6 तीव्रतेच्या धक्क्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण)
प्रांतीय हवामानशास्त्र एजन्सीच्या वरिष्ठ अधिकारी कॅरोलिन यांनी सिन्हुआला सांगितले की, भूकंपामुळे प्रभावित झालेल्या भागातून नुकसान किंवा जीवितहानी झाल्याची कोणतीही प्राथमिक माहिती अधिकाऱ्यांना मिळालेली नाही.
इंडोनेशिया हा एक द्वीपसमूह असून भूकंपाच्या दृष्टीने सक्रिय पॅसिफिक रिंग ऑफ फायरवर वसलेला आहे, ज्यामुळे तो भूकंपास संवेदनशील आहे.