Storm Hit Central Tennessee: अमेरिकेच्या मध्य टेनेसीमध्ये वादळाचा कहर, 6 जणांचा मृत्यू तर 20 हून अधिक जखमी
Cyclone (Photo Credits: Pixabay)

Storm Hit Central Tennessee: अमेरिकेच्या (America) मध्यभागी टेनेसीला (Central Tennessee) धडकलेल्या भीषण वादळाने (Storm) हाहाकार माजवला आहे. यामुळे शनिवारी 6 जणांचा मृत्यू झाला असून 20 हून अधिक जण जखमी झाले आहेत. वादळामुळे अनेक शहरांमधील घरे आणि दुकानांचे नुकसान झाले आहे. वाहतूकही विस्कळीत झाली आहे. मॉन्टगोमेरी काउंटीच्या अधिकार्‍यांनी एका बातमीत सांगितले की, काऊंटीमध्ये चक्रीवादळामुळे एका मुलासह तीन लोकांचा मृत्यू झाला. याशिवाय, नॅशविले इमर्जन्सी ऑपरेशन्स सेंटरने सोशल मीडियावरील पोस्टमध्ये म्हटले आहे की, भीषण वादळामुळे तिघांचा मृत्यू झाला.

मॉन्टगोमेरी काउंटीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, आणखी 23 जखमींवर रुग्णालयात उपचार करण्यात आले. क्लार्क्सविले अग्निशमन विभागाने सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोंमध्ये घरांचे नुकसान झाल्याचे आणि महामार्गावर ट्रॅक्टरचा ट्रेलर उलटल्याचे दिसून आले आहे. (हेही वाचा - Cyclone Michong: बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या मिचॉन्ग चक्रीवादळामुळे अनेक राज्यांमध्ये अलर्ट, वेगाने वारे वाहण्याची शक्यता)

क्लार्क्सविलेचे महापौर जो पिट्स यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, ही दुःखद बातमी आहे आणि ज्यांनी आपत्तीत प्रियजन गमावले त्यांच्या कुटुंबियांप्रती आमच्या शोकसंवेदना आहेत. वादळाचा तडाखा बसलेल्या नागरिकांसाठी मदत शिबिर उभारण्यात आले आहे. तेथे मोठ्या प्रमाणात लोक विस्थापित झाले आहेत. (हेही वाचा - Cyclone Midhili: मिधिली चक्रीवादळाचे संकट, बंगालच्या आग्नेय उपसागरावर आणि अंदमान आणि निकोबार बेटांजवळ कमी दाबाचे क्षेत्र तयार)

दरम्यान, क्लार्क्सविलेचे महापौर जो पिट्स यांनी सांगितले की, त्यांच्या अडचणीच्या वेळी आम्ही त्यांना मदत करण्यास तयार आहोत. माँटगोमेरी काउंटी शेरीफ कार्यालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, दुपारी 2 च्या सुमारास चक्रीवादळाचा तडाखा बसला. स्थानिक शाळेत मदत शिबिर उभारण्यात आले असून लोकांना घरीच राहण्यास सांगण्यात आले आहे. पिट्स यांनी या वादळामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची नोंद केली आहे.