Image used for representational purpose. (Photo Credit: Pixabay)

नुकतेच सेंट्रल बँक ऑफ श्रीलंका (CBSL) ने सांगितले होते की, ते भारतीय रुपया (INR) हे श्रीलंकेत परकीय चलन म्हणून नियुक्त करण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (RBI) मंजुरीची वाट पाहत आहेत. त्यानंतर आता काही दिवसांनी बातमी आहे की, श्रीलंकेने व्होस्ट्रो खाती नावाने विशेष रुपी ट्रेडिंग खाती उघडली आहेत. परदेशी माध्यमांनी याबाबत वृत्त दिले होते. याचा अर्थ श्रीलंकेचे नागरिक आता भौतिक स्वरूपात $10,000 (INR 8,26,823) स्वतःजवळ बाळगू शकतात. या निर्णयामुळे श्रीलंकन आणि भारतीय एकमेकांशी आंतरराष्ट्रीय व्यवहारांसाठी अमेरिकन डॉलरऐवजी भारतीय रुपये वापरू शकतात. भारत सरकार या वर्षी जुलैपासून डॉलरची कमतरता असलेल्या देशांना रुपयाच्या सेटलमेंट मेकॅनिझममध्ये आणण्याचा प्रयत्न करत आहे. याआधी श्रीलंकेने आरबीआयला सार्क प्रदेशात व्यापार आणि पर्यटनाला चालना देण्याची विनंती केली होती.