महिलेने केला अल्पवयीन मुलावर बलात्कार, गर्भवती राहिल्यावर Facebook पोस्टच्या माध्यमातून दिली माहिती
woman raped boy | | Image only representative purpose (Photo credit: File Image)

एका 41 वर्षीय महिलेने अल्पवयीन मुलावर अनेकवेळा बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बलात्कारातून ही महिला गर्भवती राहीली. आपण गर्भवती राहिल्याची माहिती या महिलेने ‘Facebook’ पोस्टच्या माध्यमातून दिली. त्यानंतर या प्रकरणाचा उलघडा झाला. पीडित मुलगा हा 17 वर्षांचा असल्याचे वृत्त आहे. मागील काही वर्षांपासून ही महिला या मुलावर लैंगिक अत्याचार करत होती. या महिलेला ‘Evil’ नावानेही संबोधले जाते. Spring Turner असे महिलेचे नाव असून, ती फ्लोरिडा (Florida City) शहरातील Orlando येथे राहते.

महिलेने लिहिलेल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे की, मी आता 17 वर्षांच्या सुंदर मुलाची आणि जुळ्या मुलांची आई आहे. मी तुम्हा तिघांवरही प्रचंड प्रेम करते. विशेष म्हणजे या महिलेने फेसबुक स्टेटस सिंगल असे ठेवले होते. DNA चाचणीत हा 17 वर्षांचा मुलगा या महिलेच्या जुळ्या बाळांचा वडील असल्याचे स्पष्ट झाले. हा प्रकार उघडकीस येताच पोलिसांनी महिलेला अटक केली. पोलीस तपासात पुढे आले की, पीडित मुलगा संध्याकाळच्या वेळी शाळेतून घरी आला की ही महिला त्याच्यासोबत जबरदस्तीने शरीरसंबंध करत असे. मुलाने त्यास विरोध केला की ती त्याच्यावर बलात्कार करत असे.

पीडित मुलगा 15 वर्षांचा असल्यापासून ही महिला त्याच्यावर बलात्कार करत आली आहे. आता हा मुलगा 17 वर्षांचा आहे. ’Metro’ या संकेतस्थळाने दिलेल्या वृत्तानुसार, पीडित मुलाच्या कुटुंबीयांच्या एका मित्राने Volusia County Sheriff’s Office ला ईमेल करुन माहिती दिली. त्यानंतर पोलीस तपासात हा प्रकार उघडकीस आला. (हेही वाचा, धक्कादायक! पतीने केले पत्नीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न करणा-या व्यक्तीच्या गुप्तांगाचे केले तुकडे)

तक्रार प्राप्त होताच फ्लोरिडा (Florida) शहरातील Orlando येथे राहणाऱ्या Spring Turner नावच्या महिलेला पोलिसांनी अटक केली. Spring Turner हिच्यावर आरोप आहे की, गेली 2-3 वर्षे ही महिला या मुलाचे लैंगिक शोषण करत होती. या शोषणातून ती गर्भवतीही राहिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 4 जुलै 2018 या दिवशी या महिलेने या मुलाचे शेवटचे लैंगिक शोषण केले.