Sperm | Representative image (Photo Credit- Pixabay)

वर्जिनिया येथील एका महिलेने (Virginia Woman) दावा केला आहे की, तिला गर्भधारणा होण्यासाठी तिच्या होणाऱ्या नवऱ्याने तुरुंगात असतानाही प्लास्टिकच्या सँडविच बॅगमध्ये (Sandwich Bag) शुक्राणू (Sperm ) पाठवले. महिलेने म्हटले आहे की, तिने तिच्या होणाऱ्या पण तत्कालीन परिस्थितीत तुरुंगात असलेल्या नवऱ्याकडे बाळासाठी आग्रह धरला. तिच्या नवऱ्याचाही तिच्यावर जीव. त्यामुळे त्यानेही या महिलेसाठी शुक्राणुची व्यवस्था केली. या महिलेच्या दाव्यानंतर सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया उमटली आहे. अनेकांनी या महिलेचे कौतुक केले आहे. काहींनी तिच्यावर टीका केली आहे. तर काहींनी केवळ हे अशक्य असल्याचे म्हटले आहे.

नेसा नावाच्या टिकटॉक स्टारने एका व्हिडिओत हा खुलासा केला आहे. जो आतापर्यंत 5 दशलक्षहून अधिक लोकांनी पाहिला आहे. नेशा हिचा नियोजीत पती सध्या तुरुंगात बंद आहे. काही कारणामुळे त्याला तुरुंगवासाची शिक्षा झाली आहे. साधारण एक वर्षांनी तो बाहेर येईल. त्यानंतर दोघे विवाह करतील. दरम्यान, या जोडप्याने काहीतरी हटके करण्याचा निर्णय घेतला. त्यातून त्यांना ही कल्पना सुचली. (हेही वाचा, How To Increase Sperm Count: शुक्राणुंची संख्या वाढवण्यासाठी Testicles वर बर्फ लावल्याने होतो का फायदा? जाणुन घ्या)

नेसा हिने प्रियकर ट्वेना याचे स्पर्म मिळवल्यावर 'एक वेडा अनुभव' (a crazy experience) म्हणत सोशल मीडियावर तो कथन केला. दरम्यान, सुरुवातीला तिची गर्भधारणा चाचणी सकारात्मक आली. पण पुढे लवकरच ती चुकीची असल्याचे निष्पन्न झाले आणि ती गर्भवती नसल्याचेही पुढे आले.

स्पर्मचा वापर केल्यानंतर ही महिला साधारण एक आठवड्यांनी डॉक्टरांकडे गेली. तत्पूर्वी तिने एका मेडीकल स्टोअरमधून गर्भधारणा चाचणी पाहण्याचे किट विकत घेतले. ज्यात ती चाचणी सकारात्मक आली. परंतू, डॉक्टरांनी वैद्यकीय तपासणी केल्यावर मात्र ती गर्भवती नसल्याचेच पुढे आले.