Firing | Representational image (Photo Credits: pixabay)

Firing And Stabbing in Sydney Shopping Mall: ऑस्ट्रेलिया (Australia) तील सिडनी येथील एका शॉपिंग मॉल (Shopping Mall) मध्ये गोळीबार (Firing) आणि चाकूने हल्ला केल्याच्या घटनेत चार जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेत अनेक जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वेस्टफील्ड बाँड जंक्शनच्या शॉपिंग सेंटरमध्ये गोळीबार आणि चाकूहल्ला झाला.

या घटनेनंतर शॉपिंग मॉल रिकामा करण्यात येत आहे. पोलिस बचावकार्य करत आहेत. पोलिसांनी हल्लेखोराला ठार केल्याचे वृत्त आहे. मात्र, अद्याप याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. स्थानिक लोकांनी सांगितले की, मॉलमधून सतत गोळीबाराचा आवाज येत होता. त्यानंतर लोक तेथून पळू लागले. मिळालेल्या माहितीनुसार, मॉलमध्ये चार जणांनी चाकूने हल्ला केला. (हेही वाचा -Kerala: केरळमधील व्यक्ती सौदी अरेबियात कैद, लोकांनी सुटकेसाठी 34 कोटी रुपये उभारले; मुख्यमंत्र्यांनी मानले जनतेचे आभार)

ऑस्ट्रेलियन न्यूज वेबसाइट news.com.au नुसार, एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, ही घटना घडली तेव्हा मॉलमध्ये गर्दी होती. जमिनीवर सर्वत्र रक्त पसरले होते. मिळालेल्या माहितीनुसार, शेकडो लोकांना मॉलमधून बाहेर काढण्यात आले आहे. न्यू साउथ वेल्स पोलिसांनी लोकांना या भागापासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे.