2020 मध्ये अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात मारल्या गेलेल्या इराणी लष्करी नेत्याच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी एका युवतीने आपल्या 'डेट'वर प्राणघातक हल्ला केला आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या 21 वर्षीय युवतीने अमेरिकेतील (USA) लास वेगासच्या नेवाडा हॉटेलच्या खोलीत सेक्स (Sex) करत असताना डेटवर हल्ला केला. KLAS-TV ने याबाबत वृत्त दिले आहे. निका निकोबिन असे या 21 वर्षीय तरुणीचे नाव आहे. तिच्यावर खुनाचा प्रयत्न करण्याचा आरोप आहे. तिला $60,000 च्या जामिनावर ठेवण्यात आले आहे.
इराणी जनरल कासिम सुलेमानी याच्या हत्येचा बदला घेण्यासाठी एका इराणी महिलेने डेटचे नाटक केले. तिने एका तरुणाला हॉटेलवर बोलावले आणि त्या व्यक्तीसोबत शारीरिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला. सेक्सदरम्यान तिने त्याच्यावर चाकूने हल्ला केला. कासिम सुलेमानी 2020 मध्ये अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात ठार झाला होता. मिळालेल्या माहितीनुसार, निकोबिन या व्यक्तीला डेटिंग वेबसाइट ‘प्लेंटी ऑफ फिश’वर भेटली होती. 5 मार्च रोजी हेंडरसनमधील सनसेट स्टेशन हॉटेल आणि कॅसिनो येथे भेटण्यास त्याने सहमती दर्शवली. (हेही वाचा: Russia Ukraine War: गे डेटिंग अॅप 'Grindr' ला भुलले रशियन सैनिक; ब्रिटीश इंटेलिजन्सने केली हेरगिरी, युक्रेनला पुरवली माहिती)
सेक्स करण्यापूर्वी निकोबिनने दिवे बंद केले होते मात्र त्याआधी तिने या व्यक्तीच्या डोळ्यावर पट्टी बांधली होती. त्यानंतर अमेरिकन सैन्याविरुद्ध बदला घेण्यासाठी तिने त्याच्या गळ्यावर वार केला. निका निकोबिनने पोलिसांना सांगितले की, तिला फक्त या व्यक्तीला दुखवायचे होते आणि त्याची हत्या करण्याचा तिचा विचार नव्हता. वार केल्यानंतर, पीडितेने निकोबिनला त्याच्यापासून दूर ढकलले व तो खोलीतून पळून गेला. त्यानंतर तिने ताबडतोब 911 वर कॉल करून पोलिसांना याची माहिती दिली.
2020 मध्ये बगदाद विमानतळावरून जात असताना कासिम सुलेमानीचा ताफा अमेरिकन MQ-9 रीपर ड्रोनच्या लक्ष्याखाली आला. त्यावेळी अमेरिकन सैनिकांनी त्याला मारले. कासिम सुलेमानी हा इस्लामिक रिपब्लिकच्या परदेशी कारवायांसाठी जबाबदार होता. पोलिसांच्या अहवालानुसार, इराणमध्ये कासिम सुलेमानी याच्या हत्येप्रकरणी अन्याय झाल्याचे निकाचे मत आहे. निकावर खुनाचा प्रयत्न, हल्ला आणि चोरीचे गुन्हे दाखल आहेत. 24 मार्च रोजी तीला न्यायालयात हजर केले जाणार आहे.