Lidia Thorpe | (Photo Credits: Facebook)

Parliament of Australia: महिला खासदाराने देशाचे सर्वोच्च सभागृह असलेल्या कायदेमंडळात म्हणजेच संसदेत लैंगिक अत्याचाराचा आरोप केल्याने ऑस्ट्रेलियात खळबळ उडाली आहे. महिला खासदाराने गुरुवारी (15 जून) संसदेमध्ये साश्रुपूर्ण नयनांनी स्वत: वर बेतलेला प्रसंग कथन केला आणि म्हटले की, संसदेची इमारत महिसांसाठी काम करण्यास सुरक्षीत नाही. महिला खासदार असलेल्या लिडिया थॉर्प (Lidia Thorpe) सभागृहात सांगितले की, संसदेच्या इमारतीत आपल्यावर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न झाला. इमारतीच्या एका कोपऱ्यात एका ताकदवान मनुष्याने त्यांना अयोग्य पद्धतीने स्पर्ष करण्याचा प्रयत्न केला. ज्यामुळे त्यांना प्रचंड अपमानीत वाटले. तसेच, महिलांना काम करण्यासाठी ही इमारत सुरक्षीत नसल्याचीही आपली भावना झाल्याचे त्या म्हणाल्या. लिडिया थॉर्प यांच्या आरोपांनंतर ऑस्ट्रेलियात खळबळ उडाली आहे. जगभरातील प्रसारमाध्यमांनीही या वक्तव्याची दखल घेतली आहे. लिडिया थॉर्प (Lidia Thorpe) या अपक्ष खासदार ( Independent Senator) आहेत.

लिडिया थॉर्प यांनी तिच्या एका सहकारी खासदारावर (सिनेटवर) लैंगिक अत्याचाराचा आरोप केला. हा आरोप तिने 14 जून रोजी केला. मात्र, संसदीय मंडळाने दबाव आणल्याने तिला आपला आरोप मागे घ्यावा लागल्याचेही त्यांनी म्हटले. दरम्यान, लिडिया थॉर्प यांनी आज म्हणजेच 15 जून रोजी आरोपांचा मुख्य भाग पुन्हा सांगितला. दरम्यान, लिडिया थॉर्प यांनी ज्या सहकाऱ्यावर दावा केला आहे त्याने सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. दृकश्राव्य माध्यमाद्वारे सभागृहात बाजू मांडताना या सरकाऱ्याने त्याच्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले. तसेच, हा प्रकार अत्यंत कठोर असून त्याची कसून चौकशी व्हावी असेही म्हटले. (हेही वाचा, Boris Johnson Quits as UK Lawmaker: बोरिस जॉन्सन यांचा खासदारकी चा देखील राजीनामा; 'Witch-Hunt’ चा बळी पडल्याचा दावा)

दरम्यान, आपल्यावर गुदरलेला प्रसंग सभागृहात सांगताना लिडिया थॉर्प यांचे हात थरथरत होते आणि डोळ्यांंमध्ये पाणी होते. त्यांनी आपल्या भाषणात बोलताना सांगितले की, आपल्यासोबत घडलेल्या प्रसंगापासून आपण दरवाजा उघडायलाही घाबरतो. आपण पहिल्यांदा दरवाजा किलकीला करतो. थोडा उघडतो आणि दरवाजाबाहेर किंवा आत कोणी नाही ना, याची खात्री करतो आणि मगच पूर्ण दरवाचा उघडतो असे सांगितले. दरम्यान, लिडिया थॉर्प यांच्या आरोपांनंतर लिबरल पार्टीने संबंधित खासदाराला निलंबीत केले आहे.