प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credit : Pixabay).

अमेरिकेतील कोलोरॅडो (US Colorado) राज्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथे एका 31 वर्षीय महिलेने गेल्या वर्षी 13 वर्षीय मुलासोबत शारीरिक संबंध (Sex) प्रस्थापित केले होते व त्यामुळे ती गर्भवती राहिली. कोलोरॅडोच्या फाउंटन पोलिसांनी या महिलेविरुद्ध लैंगिक शोषणाच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला होता. महिलेने आपला गुन्हाही मान्य केला आहे, मात्र तिला तुरुंगात जावे लागणार नाही.

डेली मेलच्या रिपोर्टनुसार, आरोपी महिलेचे नाव एंड्रिया सेरानो (Andrea Serrano) आहे. एंड्रियाला 2022 मध्ये अटक करण्यात आली होती. अटकेच्या वेळी ती गरोदर होती आणि तिने एका मुलाला जन्म दिला आहे.

गेल्या वर्षी जून महिन्यात ही बाब उघडकीस आली होती. एंड्रियाला जुलैमध्ये $70,000 च्या बाँडवर सोडण्यात आले होते. गुन्हेगारी प्रतिज्ञापत्रानुसार, चौकशीदरम्यान, महिलेने पोलिसांना सांगितले की, सुरुवातीच्या काळात हा मुलगा तिच्याकडे एक आई म्हणून पाहत असे आणि तिला आई म्हणूनच हाक मारत असे. मात्र एंड्रियाने याचा गैरफायदा घेत त्याच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले.

एंड्रिया सेरानो हिच्यावर फाउंटन पोलिसांनी विश्वास भंग, लैंगिक शोषण आणि पीडितेच्या पालकांवर हल्ला केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी एंड्रियाला सोडल्यानंतर, तिच्या वकिलाने पीडित पक्षाच्या वकिलासोबत एक करार केला. करारानुसार, एंड्रिया सेरानोचे नाव एक लैंगिक अपराधी म्हणून रेकॉर्डला लावले जाईल, परंतु हा करार तिला तुरुंगात जाण्यापासून वाचवेल. रिपोर्ट्सनुसार, एंड्रियाने हा करार स्वीकारला आहे. (हेही वाचा: संशोधकांनी विकसित केल्या पुरुषांसाठी गर्भनिरोधक गोळ्या; थांबवणार शुक्राणूंची हालचाल, जाणून घ्या सविस्तर)

एंड्रियाचे कुटुंबीयांनी बाळाचा ताबा मिळवण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल करण्याचा विचार करत आहेत. एंड्रियाला मुलाचा ताबा मिळाल्यास ती तुरुंगात जाण्यापासून वाचेल, पण तिच्यावरचा खटला सुरूच राहणार आहे. मात्र पीडित मुलाची आई या कराराबाबत खूश नाही. सध्या हा मुलगा अवघ्या 14 वर्षांचा आहे. या प्रकारामुळे आपल्या मुलाचे बालपण हिरावले गेले अशी तिची भावना आहे.