आजकाल लहान मुलांच्या लैंगिक शोषणासंबंधी (Child Abuse) अनेक प्रकरणे समोर येत आहेत. सध्या काही सामाजिक संस्था पालकांना याबाबत जागरूक करत आहेत, जेणेकरून ते मुलांना लैंगिक छळाला बळी पडण्यापासून वाचवू शकतील. परंतु ज्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवून आपली मुले सोपवावी अशा शिक्षकांनीच मुलांचा गैरफायदा घेतला तर? अमेरिकेतून (US) असेच एक अतिशय धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. युएसमधील फ्लोरिडा येथे एका महिला शिक्षिकेने (Teacher) तिच्या पुरुष विद्यार्थ्याचे लैंगिक शोषण केले आहे.
शिक्षिकेने अनेकवेळा तिच्या गाडीमध्ये या अल्पवयीन मुलाशी शारीरिक संबंध ठेवले आहेत. डेली स्टारच्या अहवालानुसार, फ्लोरिडा येथील 31 वर्षीय शिक्षिका Brittany Lopez-Murray ने 14 वर्षीय विद्यार्थ्याला आमिष दाखवून त्याच्याशी अनेकवेळा सेक्स केला. अहवालानुसार, ब्रिटनी तिच्या कारमध्ये हे घृणास्पद काम करत असे. आपले या मुलावर प्रेम असल्याचे भासवून ती त्याला फूस लावून तिच्या कारमध्ये बोलावत असे. एवढेच नाही तर ब्रिटनी कारमध्ये या मुलासोबत नग्न फोटोही क्लिक करत असे. ब्रिटनीला गेल्या शनिवारी अटक करण्यात आली आणि तिच्यावर बाल लैंगिक शोषणाचा आरोप ठेवण्यात आला.
अहवालानुसार, हा मुलाच्या वहिनीला त्याच्या फोनमध्ये या शिक्षिकेचे नग्न फोटो आणि अश्लील मेसेजेस आढळले. त्यानंतर तिने हे फोटो मुलाच्या वडिलांना दाखवले. त्यांनाही हे फोटो पाहून आश्चर्याचा धक्काच बसला व त्यांनी ताबडतोब शाळेत याबाबत तक्रार केली. ही शिक्षिका एक ड्रामा टीचर होती. मुलगा मैदानावर बास्केटबॉल सराव करत असताना ती त्याला तिथून आपल्या कारमध्ये घेऊन जात असे. (हेही वाचा: Shocking: फ्रांसच्या चर्चमध्ये 3.30 लाख लहान मुलांवर पाद्री आणि स्टाफकडून लैंगिक अत्याचार; पिडीतांमध्ये 80 टक्के पुरुषांचा समावेश)
ब्रिटनी त्या शाळेत सुमारे 4 वर्षे शिकवत होती. महिलेच्या वकिलाने सांगितले की, ती निर्दोष आहे आणि तिला फसवले जात आहे. मियामी-डेड स्कूल डिस्ट्रिक्टने जारी केलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, महिलेचे वर्तन दुर्दैवी आहे. प्रत्येक कर्मचाऱ्याला प्रशिक्षण दिले जाते आणि त्यांनी नियमांचे पालन करणे आणि पदाची प्रतिष्ठा राखणे अपेक्षित आहे. शाळेने महिलेला तात्काळ कामावरून काढून टाकले आहे. आता ती त्या जिल्ह्यातील कोणत्याही शाळेत शिकवू शकणार नाही.