King Juan Carlos (संग्रहित संपादित प्रतिमा)

राजे, राजघराणे आणि त्यांच्या कहाण्या अजूनही मोठ्या चवीने सांगितल्या जातात. जगातील विविध देशांचे राजे आणि सम्राट यांच्याशी संबंधित अनेक चित्र-विचित्र कथा इतिहासाच्या पानावर नोंदवल्या गेल्या आहेत, ज्या अनेकवेळा चर्चेचा विषय ठरतात. राजघराण्याशी निगडीत अनेक रहस्ये असतात जी फार कमी लोकांना माहीत असतात. अशी रहस्ये वर्षानुवर्षे जगापासून लपवून ठेवली जातात मात्र अखेर सत्य सर्वांच्यासमोर येतेच. सध्या स्पेनच्या एका माजी राजाशी (Spanish King) संबंधित एक बातमी बरीच चर्चेत आहे.

स्पॅनिश राजघराण्याचा माजी राजा जुआन कार्लोस (Juan Carlos) याने 1975 मध्ये आपल्या राज्याचा पदभार स्वीकारला. आता जुआनशी संबंधित एका वादग्रस्त बातमीने सर्वांना चकित केले आहे. टाइम्सच्या रिपोर्टनुसार, जुआन सेक्स अॅडिक्ट होता. त्याचे सेक्सचे व्यसन संपूर्ण देशासाठी चिंतेचा विषय ठरला होता, कारण त्यामुळे देशाचे नाव बदनाम होत होते. अलीकडेच, स्पेनचे माजी पोलीस आयुक्त जोस मॅन्युएल व्हिलारेजो (Jose Manuel Villarejo) यांनी संसदीय सुनावणीदरम्यान एक धक्कादायक खुलासा केला आहे.

त्यांनी सांगितले की जुआनला सेक्सचे इतके मोठ्या प्रमाणावर व्यसन होते की त्याचे 5000 हून अधिक स्त्रियांशी संबंध होते. राजाची सेक्सची सवय ही राजघराण्यासाठी मोठी समस्या बनली होती. कालांतराने ती इतकी वाढली की, राजाचा सेक्स ड्राईव्ह कमी करण्यासाठी त्याच्या शरीरात महिलांचे हार्मोन्स (Female Hormones) सोडण्यात आले. जोस म्हणाले की, स्पेनिश गुप्त सेवाद्वारे राजाला ‘टेस्टोस्टेरोन ब्लॉकर्स’ देण्यात आले.

डेली मेलमधील एका अहवालात असाही दावा करण्यात आला आहे की, जुआनने राजकुमारी डायनालाही त्याची प्रेमिका बनण्यासाठी संपर्क केला होता. परंतु आम्ही या अहवालाची पुष्टी करत नाही. जुआनच्या स्पॅनिश गायिका, बेल्जियन गव्हर्नन्स आणि इटालियन राजकुमारी यांच्याशीही संबंध असल्याच्या बातम्या आल्या आहेत. (हेही वाचा: पंतप्रधान Ersan Saner यांचा Solo Sex Act व्हिडिओ झाला व्हायरल; द्यावा लागला राजीनामा)

स्पॅनिश इतिहासकार Amadeo Martinez Ingles ने जुआनवर ‘जुआन कार्लोस: द किंग ऑफ 5,000 लव्हर्स’ असे पुस्तकही लिहिले आहेत. जुआनने केवळ 6 महिन्यांत 62 महिलांशी लैंगिक संबंध ठेवल्याचा दावा पुस्तकात करण्यात आला आहे. जुआन सध्या निर्वासित आहे आणि अबू धाबीमध्ये राहत आहेत. जुआनवर पैशांचा गैरवापर केल्याचा आरोप होता, त्यानंतर तो देश सोडून पळून गेला.