Sex 5,000 Women: धक्कादायक! बॉसने ठेवले 5000 महिलांसोबत लैंगिक संबंध; कंपनीच्या माजी कर्मचाऱ्यांनी केले खळबळजनक आरोप
Sex | Representational Image | (Photo Credit: PTI)

कंपन्यांचे व्यवस्थापक-बॉस यांनी त्यांच्या कर्मचार्‍यांचे लैंगिक शोषण (Sexual Abuse) केल्याच्या अनेक घटना किंवा असे आरोप आपल्या कानावर आले असतील. आता अमेरिकेतील एका अब्जाधीश व्यावसायिकावरही असेच अतिशयखळबळजनक आरोप करण्यात आले आहेत. सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे या अब्जाधीश व्यावसायिकाने एक यादी तयार केली आहे, ज्यात त्याने अशा मुली आणि महिलांची नावे समाविष्ट केली आहेत ज्यांच्यासोबत त्याचे संबंध होते. या यादीमध्ये कमीत कमीत 5000 महिलांची नावे समाविष्ट आहेत. एका माजी कर्मचाऱ्याने याबाबतचा खुलासा केला आहे.

57 वर्षीय अमेरिकन उद्योगपती मायकल गोगुएन (Michael Goguen) याच्यावर त्याच्या माजी कर्मचाऱ्यांनी लैंगिक शोषणाचा खळबळजनक आरोप केला आहे. धक्कादायक म्हणजे मायकेल गोगुएनवर एकाच वेळी चार माजी कर्मचाऱ्यांनी गैरवर्तन केल्याचा आरोप केला असून, कर्मचाऱ्यांनी आपल्या बॉसविरुद्ध खटला दाखल केला आहे. कर्मचाऱ्यांनी बॉसवर आरोप केले आहेत की, त्याने जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले, घडलेल्या प्रकाराबाबत तोंड बंद ठेवण्यासाठी प्रेशर टाकले, मुलींना त्याने 'हरम'मध्ये जबरदस्तीने ठेवले.

या कर्मचाऱ्यांनी सांगितले की, मायकलने त्याच्या 'हरम'ची देखभाल करण्यासाठी त्यांच्याकडे मदत मागितली होती. 'हरम' हे असे ठिकाण किंवा गोष्ट आहे जिथे एकापेक्षा अधिक स्त्रिया किंवा बायका राहतात व जिथे प्रणयक्रीडा चालते. डेलीस्टारच्या वृत्तानुसार माजी कर्मचार्‍यांनी त्यांच्या 135 पृष्ठांच्या खटल्यात, मायकेलकडे अनेक आलिशान आणि ‘गुप्त घरे’ असल्याचा आरोप केला आहे, जिथे तो कैक महिलांना लैंगिक संबंध ठेवण्यासाठी घेऊन जातो.

आरोप आहे की आरोपी मायकल गोगुएन याने 5000 महिलांच्या नावांची यादी देखील तयार केली आहे, ज्यामध्ये त्याने सर्व मुली आणि महिलांची नावे लिहिली आहेत ज्यांच्याशी त्याने इच्छेनुसार किंवा त्यांच्या इच्छेविरुद्ध संबंध ठेवले आहेत. 57 वर्षीय मायकेल गोगुएन हा सेक्वॉया कॅपिटलचा माजी भागीदार आहे, जो आता स्वतःची कंपनी चालवतो.

खटल्यानुसार, हा विवाहित अब्जाधीश व्यावसायिक, ज्याला दोन मुले आहेत, त्याने एकदा त्याच्या एका कर्मचाऱ्याला त्याच्या मित्राचा खून करण्यास सांगितले होते. कारण त्या मित्राला मायकलबद्दल बरीच माहिती होती. 2016 मध्ये मायकेल गोगुएनवर त्याच्या गर्लफ्रेंडनेही बलात्काराचा आरोप केला होता.