Virginity Test | (Photo credit: archived, edited, symbolic images)

भारतात आजही मुलींच्या कौमार्याला (Virginity) फार महत्व दिले जाते. लग्नासाठी मुलगी व्हर्जिनच हवी असा अनेकांचा आग्रह असतो. मुलींना आजकाल याच गोष्टीची चिंता आहे. लग्नाच्या पहिल्या रात्री स्वत: ला कुमारिका म्हणून सिद्ध करण्याचा त्यांच्यावर दबाव असतो. म्हणूनच आता जगभरातील बर्‍याच मुली स्वतःवर गुप्त शस्त्रक्रिया करवून घेत आहेत. वेगवेगळ्या देशांमध्ये या शस्त्रक्रियेची किंमत वेगळी आहे. जर तुमची मागणी खास असेल तर तुम्हाला त्यासाठी जास्त पैसे द्यावे लागतील. भारतात त्याची किंमत 15 हजार ते 60 हजार रुपयांपर्यंत आहे. तर परदेशात ते 2.75 लाखांपर्यंत जाऊ शकते.

ब्रिटन, फिलिपिन्स, भारत यासह जगातील बर्‍याच देशांमध्ये अनेक डॉक्टर अशा  व्हर्जिनिटी रिगेन शस्त्रक्रियेद्वारे लाखो रुपये कमावत आहेत. या गोष्टीचा खुलासा लंडनमध्ये झाला, जिथे अशी 22 गुप्त क्लिनिक आढळून आली आहेत. 30 ते 40 मिनिटांपर्यंत चालणार्‍या या शस्त्रक्रियेसाठी एकूणच 15 हजार ते 2.75 लाखांपर्यंत खर्च येऊ शकतो. पारंपारिक कुटुंब, बुरसटलेले विचार आणि सामाजिक दबाव अशा अनेक कारणांमुळे हे घडत आहे. (हेही वाचा: Sex Myths: पुरुषाचे लिंग ते स्त्रीचे योनीपटल, आदीपर्यंत समाजात संभोगाबद्दल आहेत अनेक गैरसमज, जाणून घ्या वास्तवदर्शी काही मुद्दे)

कौमार्य (Hymen) हे केवळ शारीरिक संबंध ठेवल्यानेच तुटत नाही, तर सायकल चालविणे, घोडा चालविणे, खेळणे, उडी मारणे अशा अनेक कारणामुळे तुटू शकते. मात्र समाजाला  हे पटवून सांगणे अवघड आहे. हे ऑपरेशन सामान्यत: हायमेन रिपेयर म्हणून ओळखले जाते. या ऑपरेशनमध्ये स्त्रियांच्या योनीमध्ये त्वचेचा एक थर निर्माण करवला जातो. जेव्हा स्त्री पहिल्यांदा संभोग करते तेव्हा हा तुटतो. अशाप्रकारे लग्नाआधी जर का स्त्रीचे कौमार्य भंग झाले असेल, तर अशा शस्त्रक्रियेद्वारे महिला ते कौमार्य पुन्हा मिळवू शकते. अशी ऑपरेशन्स करणार्‍या बहुतेक तरूणी स्त्रिया मध्य-पूर्व आणि आशियाई कुटुंबातील आहेत.