सौदी अरेबिया (Saudi Arabia) आणि पाकिस्तान यांच्यातील संबंधांमधील कटुतेचे आणखी एक उदाहरण समोर आले आहे. सौदी सरकारने काही नवीन नियम लागू केले आहेत, त्यानुसार देशातील पुरुषांना पाकिस्तान (Pakistan), बांगलादेश (Bangladesh), चाड (Chad) आणि म्यानमारमधील (Myanmar) महिलांशी विवाह करण्यास मनाई करण्यात आली आहे. पाकिस्तानी वृत्तपत्र 'डॉन' ने सौदी माध्यमांच्या वृत्ताच्या हवाल्याने बातमी दिली आहे. अनधिकृत आकडेवारीनुसार सध्या सौदी अरेबियामध्ये या चार देशांतील सुमारे पाच लाख महिला राहतात.
मक्का येथील पोलिस महासंचालक मेजर जनरल असफ अल कुरेशी यांच्या हवाल्याने अहवालात म्हटले आहे की, परदेशी व्यक्तीशी लग्न करण्याची इच्छा असणाऱ्या सौदी पुरुषांना आता कठोर नियम पाळवे लागतील. डॉनच्या मते सौदी पुरुषांना परदेशी व्यक्तीशी लग्न करण्यापासून रोखण्यासाठी हे पाऊल उचलले गेले आहे. यासह परदेशी लोकांशी लग्नाची परवानगी देण्यापूर्वी अतिरिक्त नियमही ठरविण्यात आले आहेत.
कुरेशी म्हणाले, ज्यांना परदेशी महिलांशी लग्न करण्याची इच्छा आहे त्यांनी आधी सरकारची संमती घेतली पाहिजे. तसेच, लग्नासाठी एक अर्ज सादर करावा लागेल. यासह घटस्फोटित पुरुषांना घटस्फोटाच्या सहा महिन्यांच्या आत अर्ज करण्याची परवानगी दिली जाणार नाही. यासाठी अर्जदाराचे वय 25 वर्षांपेक्षा जास्त असणे आवश्यक आहे. त्याने स्थानिक जिल्हा महापौरांनी स्वाक्षरी केलेले ओळखपत्र तसेच त्याच्या फॅमिली कार्डाची प्रत असलेली इतर ओळखपत्रे जोडावीत. (हेही वाचा: Sri Lanka मध्ये बुरखा बंदी; हजारो इस्लामिक शाळा बंद करण्याचा सरकारचा निर्णय)
अहवालात असे नमूद केले आहे की, 'अर्जदाराचे आधीच लग्न झाले असेल तर त्याने त्याची पत्नी एकतर अपंग, दीर्घ आजाराने ग्रासलेली किंवा वंध्यत्व असल्याचे सिद्ध करण्यासाठी रुग्णालयातून रिपोर्ट सादर केला पाहिजे'. सर्वांना नियमांचे काटेकोरपणे पालन करावे लागेल आणि त्यांच्या उल्लंघनावर कारवाई केली जाईल असे कुरेशी यांनी म्हटले आहे.