 
                                                                 पाकिस्तानच्या तुरुंगात कैदेत ठेवण्यात आलेल्या सरबजित सिंग यांच्या मारेकऱ्याची हत्या करण्यात आली आहे. लाहोरमध्ये अंडरवर्ल्ड डॉन अमीर सरफराज याची अज्ञातांकडून गळा चिरून हत्या केली. याप्रकरणी सरबजित यांची मुलगी स्वप्नदीप यांनी प्रतिक्रिया दिली. सरफराजच्या मृत्यूच्या वृत्तावर स्वप्नदीप म्हणाल्या, सुरुवातीला मला समाधान वाटले. पण नंतर मला वाटलं की हा न्याय नाही. पप्पांच्या निर्घृण हत्येत तीन ते चार लोक सामील होते. त्यामुळे अमीरची हत्या करून हा कट लपवण्याचा प्रयत्न केला जात आहे. ( Uttrakhand Crime: पूजारी आणि कर्मचाऱ्यांनी मिळून भाविकांना बदडले, काली मंदिरातील व्हिडिओ व्हायरल)
वडिलांनी पाठवलेल्या शेवटच्या पत्रांचा उल्लेख करत स्वप्नदीप म्हणाल्या, सरबजित यांनी त्यांना दिले जात असलेल्या स्लो पॉयजनबद्दल लिहिले होते. त्यांना तुरुंगात अमानुष वागणूक दिली होती. सरबजित यांनी एक डायरीही लिहीली होती. यामध्ये तुरुगांत होत असलेल्या गोष्टींबद्दल तपशीलवार लिहिले होते. परंतु, ही डायरी वडिलांच्या मृतदेहाबरोबर पाठवण्यात आली नाही”, असंही त्यांनी म्हटलं.
शेतकरी असलेले सरबजित सिंग हे भारत पाकिस्तानच्या सीमेवर असलेल्या तरनतारन जिल्ह्यातील भिखीविंड गावचे रहिवासी होते. 30 ऑगस्ट 1980 मध्ये ते चुकून पाकिस्तानच्या हद्दीत पोहोचले. त्यामुळे पाकिस्तानी लष्कराने त्यांना पकडलं आणि त्यांच्यावर खोटे आरोप लावण्यात आले. लाहोर आणि फैसलाबादमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटाचं खापर त्यांच्यावर फोडण्यात आलं. या बॉम्बस्फोटाप्रकरणी त्यांना कोर्टाने फाशीची शिक्षाही सुनावली होती. परंतु, फाशीच्या शिक्षेआधीच तुरुंगातील इतर कैद्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. गळा चिरून त्यांची हत्या करण्यात आली.
 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                     
                     QuickLY
                                                                                QuickLY
                                     Socially
                                                                                Socially
                                     
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                     
                     
                     
                     
                                 
                                 
                                 
                                 
                                 
                                
