Uttrakhand Crime PC TWITTER

Uttarkhand Crime: उत्तराखंड येथील हरिद्वार सिध्दपीठ श्री दक्षिण काली मंदिराबाहेर एक धक्कादायक घटना घडली आहे. मंदिराचे पुजारी, भाविक आणि कर्मचारी यांच्यात मारामारी झाली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अनेकांनी या व्हिडिओवर संताप व्यक्त केला आहे.  पार्किंगच्या तिकीटावरून वाद झाला असल्याचे समोर आले आहे. (हेही वाचा-बालविवाह रोखल्याने तिच्या आयुष्यात नवा प्रकाश; केंद्रीय शिक्षण मंत्रालयानेही घेतली दखल

मिळालेल्या माहितीनुसार, उत्तराखंड येथील सिध्दपीठ श्री दक्षिण काली मंदिरात रविवारी ही घटना घडली आहे. पार्किंग तिकिटावरून वाद झाला असल्याचे समोर येत आहे. भाविक हे उत्तर प्रदेशातून आले होते.मंदिराचे पूजारी आणि कर्मचाऱ्यांनी भाविकांचा पाळलाग करत भाविकांवर हल्ला केला. हे प्रकरण इतकं वाढलं की, पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली आहे. चांदी घाट चौकीतील पोलिस अधिकाऱ्यांनी हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली.

या हिंसाचारामुळे संतापलेल्या भाविकांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. स्टेशन हाऊस ऑफिसर नितेश शर्मा यांनी दक्षिण पीठाधीश्वर स्वामी कैलाशानंद गिरी यांच्याकडून घटनेची माहिती गोळा केली आहे. अद्याप कोणत्याही पक्षाकडून औपचारिक तक्रार दाखल केलेली नाही. मात्र, लवकरच योग्य ती कारवाई केली जाईल अशी माहिती पोलिसांकडून मिळाली आहे.

व्हिडिओत दिसल्याप्रमाणे, मंदिराचे पुजारी आणि कर्मचारी भाविकांना मंदिराबाहेर  काठ्यांनी पळवून पळवून मारताना दिसत आहे. कोणीही यात हस्तक्षेप करत नाही. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. एकाने हा व्हिडिओ फोनमध्ये कैद केला आहे.