रशियातील (Russia) मॉस्को (Moscow) येथे सुखोई सुपरजेट 100 (Sukhoi Superjet 100) विमानाचे एमर्जन्सी लँन्डिंग करण्यात आले त्यावेळी विमानाला आग लागली. या दुर्घटनेत 41 जणांचा मृत्यू झाला असून त्यामध्ये दोन लहान मुलांनी आपला जीव गमावला आहे. तर अन्य प्रवाशांना एमर्जन्सी स्लाईड्सच्या सहाय्याने विमानातून सुखरुप बाहेर काढण्यात आले.
मोरशांस्कला येथे जाण्यासाठी विमानाने उड्डाण केले होते. या विमानात एकूण 73 प्रवासी आणि 5 कर्मचारी होते. तर दुर्घटनेच्या वेळी 41 जणांचा मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात येत आहे.(लॅंडिंग करताना बोइंग 737 विमान नदीत कोसळले; सर्व 136 प्रवासी सुरक्षित)
Посадка пылающего Sukhoi Superjet 100 в Шереметьево. Пилоты - стальные люди pic.twitter.com/ETlzOHbUKw
— Дмитрий Смирнов (@dimsmirnov175) May 5, 2019
तर एमर्जन्सी लँन्डिंगवेळी विमानाचा निम्मा भाग आग लागल्यामुळे जळाला होता. मात्र विमानाला आग कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट करण्यात आलेले नाही. तर या विमानाला लागलेल्या आगीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून या घटनेचा अधिक तपास केला जात असल्याचे सांगण्यात येत आहे.