अँटी स्टेल्थिंग कायद्यानुसार (Anti Stealthing Law), जोडीदाराच्या सहमतीशिवाय संभोगादरम्यान कंडोम (Condom) काढल्यास जेलची हवा खावी लागणार आहे.फिलिपियन्समध्ये हा कायदा लागू करण्यात आला असून House Bill 3957 किंवा अँटी स्टेल्थिंग कायद्यानुसार, अशा जोडीदाराची तातडीने कोठडीत रवानगी करण्यात येणार आहे. तसेच असे केल्यास तो एक प्रकारचा लैंगिक अत्याचार समजला जाईल, असेही या कायद्यात म्हटले आहे.
संभोग (Sex) प्रत्येकाच्या आयुष्यातील खास गोष्ट आहे. त्यामुळे त्यात तुमची आणि तुमच्या जोडीदाराची संमती असणे गरजेचे आहे. अशावेळी गर्भधारणा होऊ नये यासाठी कंडोमचा वापर केला जातो. मात्र अशा वेळी ब-याचदा आपला जोडीदाराच्या सहमतीशिवाय पुरुष सेक्सदरम्यान कंडोम काढून टाकतात. हा एक प्रकारचा लैंगिक अत्याचार असून असे करणा-यास 12 वर्षांचा तुरुंगवास होणार असून P100000 ते P500000 पर्यंतचा दंड आकारला जाणार आहे.
हेही वाचा- पहिल्यांदा सेक्स करताय? पार्टनरशी बोलण्यापासून ते कंडोम तयार ठेवण्यापर्यंत अशी घ्या काळजी
यामुळे अनैतिक संबंध ठेवण्यावर आणि अनैतिक गर्भपातावर जाच बसेल. तसेच जर या प्रकारात महिला जोडीदार गर्भवती राहिली तर तिच्या पुरुष जोडीदाराला 20 वर्षांचा तुरुंगवास भोगावा लागणार असून P200000 ते P700000 पर्यंत दंड ठोठावण्यात येईल.
तसेच जर एखाद्याने जाणूनबुजून आपल्या महिला जोडीदाराला गर्भवती करण्यासाठी सेक्सदरम्यान कंडोम काढले तर त्याला 40 वर्षांचा तुरुंगवास होऊन P1 मिलियन ते P5 मिलियन इतका दंड आकारला जाईल.
तसेच सेक्स दरम्यान जर जोडीदाराला तुम्ही कंडोम काढल्याचे कळाले असूनही तुम्ही तिच्यासोबत संभोग केल्यास तो बलात्कार समजला जाईल. ज्यासाठी आणखी वेगळे कायदे लागू होतील.