रॉयल कपलच्या  ऑस्ट्रेलिया दौर्‍यादरम्यान चिमुकल्यासाठी प्रिंस हॅरीने मोडला रॉयल प्रोटोकॉल (Video)
प्रिंस हॅरी Photo Credit : Instagram

लंडनच्या राजघराण्याचा प्रिंन्स  हॅरी आणि मेगन मार्कल त्यांच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय दौर्‍यावर आहेत. ड्युक आणि डचेस ऑफ स्युसेक्स असणारं हे रॉयल कपल ऑस्ट्रेलिया आणि न्युझिलंडच्या दौर्‍यावर आहे. ऑस्ट्रेलियात एका शाळेतमध्ये या जोडीने एका शाळेला भेट दिली. त्यावेळेस पाच वर्षाचा एक चिमुकला या जोडीकडे खास आकर्षित झाला. त्यांचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

गोंडस चिमुकला प्रिंन्सकडे आला अन...

ऑसट्रेलियातील Buninyong Public Schoolला रॉयल कपलने भेट दिली . तेव्हा पाच वर्षांचा Luke Vincent पहिल्यांदा मेगनकडे आला. तिला पुष्पगुच्छ आणि गळाभेट दिल्यानंतर त्याने प्रिंसला पाहिले. प्रिंसही त्याला पाहून खाली बसला. Luke ला प्रिंसच्या दाढीला हात लावायचा होता. रॉयल प्रोटोकॉल मोडत प्रिंसनेही त्याला जवळ घेत दाढी आणि केसांना हात लावण्याची परवानगी दिली. या गोंडस क्षणांचा व्हिडिओ सोशल मीडियावर झपाट्याने शेअर केला जात आहे.

Luke ला सांताक्लॉजला आवडतो. ती त्याच्या विश्वातली सर्वात आवडती व्यक्ती आहे. त्यामुळे सांताक्लॉजला दाढी असते हे माहिती होते. प्रिंसची दाढी पाहून त्याला हात लावण्याचा मोह Luke ला आवरता आला नाही.

काही दिवसांपूर्वीच प्रिंस हॅरी आणि मेगन मार्कल यांनी त्यांच्याकडे गुडन्यूज असल्याची बातमी दिली आहे. मेगन गरोदर असून 2019च्या उन्हाळ्यात त्यांच्या आयुष्यात बाळाचं आगमन होणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.