प्रिन्स हॅरी आणि मेगन मार्कलकडे गुडन्यूज ! २०१९ च्या उन्हाळ्यात होणार बाळाचं आगमन
मेगन मार्कल photo credits : instagram

लंडनच्या राजघराण्याची राजकन्या युजिनीच्या विवाहानंतर पुन्हा एका नव्या गोड बातमीने घरात आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे. प्रिन्स हॅरी आणि मेगन मार्कल यांच्या आयुष्यात लवकरच नव्या चिमुकल्याचं आगमन होणार आहे. २०१९ च्या उन्हाळ्यात ड्यूक आणि डचेस ऑफ सक्सेस म्हणजेच मेगन आणि हॅरी यांच्या बाळाचं आगमन होणार आहे. मे २०१८ मध्ये हे दाम्पत्य विवाह बंधनात अडकले. सध्या प्रिन्स हॅरी आणि मेगन मार्कल हे ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड च्या दौऱ्यावर आहेत. हा या दाम्पत्याचा पहिला आंतरराष्ट्रीय दौरा आहे. नक्की वाचा : स्कोलिऑसिसच्या शस्त्रक्रियेचा व्रण दाखवत जागृती करण्यासाठी लंडनची राजकन्या युजिनानं निवडला बॅकलेस वेडिंग ड्रेस !

 

मेगन गरोदर असल्याचीही बातमी केन्सिंग्टनच्या ट्विटर अकाउंट वरून जाहीर करण्यात आली आहे. प्रिन्स हॅरी आणि मेगन मार्कलचं बाळ हे राजघराण्याचा सिंहासनावर दावा करणारा सातवा दावेदार असेल. गेल्या काही दिवसांपासून मेगन गरोदर असल्याची चर्चा होती. आज अखेर ही गोड बातमी सगळ्यांना सांगण्यात आली आहे. पंतप्रधान थेरेसा मे यांनी या जोडप्याला शुभेच्छा दिल्या आहेत. मंगळवारी हे दाम्पत्य लोकांकडून शुभेच्छा स्वीकारतील.