भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना आज '2018 Seoul peace prize' देऊन गौरवण्यात आलं आहे. दक्षिण कोरियाच्या (South Korea) दोन दिवसांच्या दौर्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हा पुरस्कार ऑक्टोबर 2018 मध्ये जाहीर करण्यात आला होता. मात्र तो आज प्रदान करण्यात आला आहे. हा पुरस्कार दक्षिण कोरियाच्या कल्चरल फाऊंडेशनकडून देण्यात आला आहे. नोटाबंदीपासून ते अगदी लोकशाहीला बळकटी देण्यासाठी मोदींनी उचललेल्या वैशिष्ट्यपूर्ण कामकाजांचा यामध्ये गौरव करण्यात आला आहे.
Seoul Peace Prize 2018 स्वीकारल्यानंतर नरेंद्र मोदी यांची प्रतिक्रिया
The Seoul Peace Prize is dedicated to the people of India & our country’s culture of peace and harmony. https://t.co/ymUdug3JYp
— Narendra Modi (@narendramodi) February 22, 2019
नरेंद्र मोदी यांना पुरस्कारासोबत 1 कोटी 30 लाख रूपयांची रक्कम मिळाली आहे. या पुरस्कराची रक्कम 'नमामि गंगे' या योजनेला दिली जाणार असल्याचं नरेंद्र मोदी यांनी सांगितलं आहे. मोदीनॉमिक्स आणि लोकशाहीला बळकटी देण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले आहेत. पुरस्कार स्विकारताना हा पुरस्कार केवळ माझा नसून माझ्या सोबत उभे रहिलेल्या कोट्यावधी भारतीयांचा आहे. असे मोदी यांनी म्हटलं आहे.
भारतामध्ये येत्या काही दिवसातच आगामी लोकसभा निवडणूकांसाठी तारखा जाहीर होणार आहे. भाजपासह नरेंद्र मोदी पुन्हा निवडणूक जिंकून सरकार स्थापन करण्यासाठी प्रयत्न करणार आहेत.