
रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतीन (Vladimir Putin) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना पुढील वर्षात मे 2020 मध्ये दुसऱ्या महायुद्धाच्या विजयाचा अमृतमोहत्सव साजरा करण्यासाठी निमंत्रण दिले आहे. नरेंद्र मोदी आणि पुतीन यांच्यामध्ये ब्रिक्स शिखर सम्मेलनादरम्यान भेट झाली होती. त्यावेळी दोघांनी देशाअंतर्गत राजकीय घडामोडी कशा वेगाने आणि अधिक मजबूत करण्याच्या मुद्द्यांवर चर्चा केली होती. मोदी हे ब्रिक्स शिखर सम्मेलनात सहभागी होण्यासाठी आले आहेत. मोदी यांनी या सम्मेलनात पुनीत यांच्या सोबत भेट घेत दहशतवादाच्या विरोधात पावले उचलण्यावर लक्ष केंद्रीत केले जाणार आहे.
ब्रिक्स जगातील पाच उभरत्या अर्थव्यवस्थेचा समूह असून त्यामध्ये ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका यामध्ये सामील आहे. मोदी यांनी या बैठकीदरम्यान दोन देशांमधील नातेसंबंध अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न केला आहे. तर व्लादिमिर पुतीन यांनी दिलेल्या निमंत्रणाबाबत उत्सुक असल्याचे मोदी यांनी स्पष्ट केले आहे.(पंडित नेहरू यांना फॉलो करतात पंतप्रधान नरेंद्र मोदी, पहा त्याचा पुरावा)