US President Joe Biden (Photo Credit: Facebook)

इंडोनेशियाच्या (Indonesia)  बाली (Bali) मध्ये एकीकडे G20 Summit साठी सारेच जागतिक नेते एकत्र आले आहेत. तर दुसरीकडे आज (16 नोव्हेंबर) सकाळी रशिया-युक्रेन संघर्षामध्ये (Russia-Ukraine War)  अधिक उग्रता आल्याचं पहायला मिळालं आहे. रशियन बनावटीचं एक रॉकेट पोलंड (Poland) शहरामध्ये कोसळलं आहे. यामध्ये 2 नागरिकांनी आपला जीव गमावला आहे. या घटनेनंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन (Joe Biden) यांनी तातडीची बैठक बोलावली आहे.

नाटो देशांचा भाग असलेल्या पोलंड मधील Przewodow या गावात रशियन बनावटीचं रॉकेट पडलं आहे. पोलंडच्या परदेश मंत्रालयाकडूनही याला दुजोरा देण्यात आला आहे. पण रशिया मात्र या हल्ल्याची जबाबदारी झटकत आहे. रशियाच्या या कृत्यामुळे आता जागतिक स्तरावर पुन्हा तणाव वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

पहा ट्वीट

युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांकडूनही या हल्ल्याचा निषेध करण्यात आला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी देखील या हल्ल्याचा निषेध केला आहे. त्यांनी जी 20 शिखर परिषद सुरू असतानाच जी 7 आणि नाटो सदस्य देशांच्या नेत्यांचीही तातडीची बैठक बोलावली आहे. नाटोचे सरचिटणीस जेम्स स्टोल्टेनबर्ग यांनीदेखील नाटो सदस्य देशांच्या राजदुतांची आपत्कालीन बैठक बोलावली आहे.