भारताच्या पंजाब नॅशनल बॅंकेमध्ये(Punjab National Bank) 13 हजार कोटींचा घोटाळा करून लंडनमध्ये पळून गेलेल्या नीरव मोदीला (Nirav Modi) आज अखेर अटक करण्यात यश आलं आहे. घोटाळेबाज नीरव मोदी याचा जामीन अर्ज लंडन न्यायालयाने फेटाळला असून आता 29 मार्च पर्यंत नीरव मोदी यांना कोठडीतच रहावं लागणार आहे. दोन दिवसांपूर्वी वेस्टमिंस्टर कोर्टाने (Westminster Court) नीरव मोदी विरोधात अटक वारंट जारी केलं होतं.
ANI Tweet
Nirav Modi's bail plea rejected by London Court, to remain in custody till March 29 pic.twitter.com/1KmWUqnfr5
— ANI (@ANI) March 20, 2019
टेलिग्राफने काही दिवसांपूर्वी लंडनमध्ये नीरव मोदी मुक्तपणे फिरताना आणि ऐशोआरामाच्या जीवनशैलीत फिरताना दिसला होता. त्यानंतर भारतीय अधिकरी लंडनमध्ये पोहचले. इडीच्या अधिकार्यांनीही या प्रकरणात पुरावे सादर करत नीरव मोदी यांच्या अटकेसाठी प्रयत्न सुरू केले. त्याला आलेले हे मोठं यश म्हणजे नीरव मोदीची अटक असल्याचं बोललं जात आहे.
भारताने नीरव मोदीच्या प्रत्यार्पणाची कारवाई सुरू केली आहे. काही महिन्यांपासून ब्रिटीश अधिकारी आणि भारतीय अधिकारी या प्रकरणाचा पाठपुरावा करत आहेत. इंटरपोलनं 2018 मध्ये जुलै महिन्यांत नीरव मोदीचे नावं रेड कॉर्नर नोटीसही जाहीर केलं होतं.