PUBG Game: पाकिस्तानमधील पंजाब प्रांतातील 14 वर्षीय मुलाने ऑनलाइन गेम 'पबजी'च्या व्यसनातून (PUBG Game Addiction) चक्क आपल्या आई आणि दोन अल्पवयीन बहिणीसह संपूर्ण कुटुंबाची हत्या केली. राजधानी लाहोर पोलीसांनी शुक्रवारीही माहिती दिली. पाठीमागील आठवड्यात लाहोर येथील काहना परिसरातील आरोग्य कर्मचारी 45 वर्षी नाहिद मुबार आणि त्यांचा 22 वर्षीय मुलगा तौमुर आणि 17 आणि 18 वर्षांच्या दोन मुली यांचा मृतदेह आढळून आला होता. पोलिसांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, नाहिद मुबारक हा 14 वर्षीय मुलगा सुखरुप होता. त्यानेच सर्वांची हत्या केल्याचे समोर आले आहे.
एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, मुलगा पबजी (PlayerUnknown's Battlegrounds) गेमच्या आहारी गेला होता. पबजी गेम खेळण्याचे आपल्याला व्यसण होते असेही त्याने कबूल केले आहे. या व्यसनातूनच आपण आपल्या आई, वडील आणि भावासह दोन बहिणींची हत्या केल्याचे पोलिसांना सांगितले. काही दिवसांपासून त्याचे ऑनलाई गेम खेळण्याचे प्रमाण प्रचंड वाढले होते. त्यातून त्याला काही मानसीक प्रश्न निर्माण झाले होते. (हेही वाचा, PUBG गेमच्या नादात जळगाव मधील 20 वर्षीय तरुणीची आत्महत्या)
पोलिसांनी म्हटले की, नाहिद मुबारक हिचा तलाख झाला होता. मुलगा अभ्यास करत नसल्याचे पाहून ती आपल्या मुलाला सातत्याने ओरडत असे. ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशीही तिने मुलाला ओरडा दिला होता. त्यानंतर मुलाने कपाटातून आपल्या आईचे पिस्तूल काढले आणि त्याने आईसह आपल्या तीन इतर बहीण भावांना गोळी घालून ठार केले. घटना घडल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी मुलाने आरडाओरडा करुन कुटुंबीयांना शेजाऱ्यांना गोळा केले आणि पोलिसांना माहिती दिली. त्याने पोलिसांना सांगितले की, तो वरच्या मजल्यावर होता. त्याला काहीच कल्पना नाही की कुटुंबीयांची हत्या कोणी केली.
पोलिसांनी अधिक माहिती देताना सांगितले की, नाहिद मुबारक हिने कुटुंबाच्या रक्षणार्थ एक पिस्तूल खरेदी केले होते. तिच्याकडे त्या पिस्तूलचा परवानाही होता. पोलिसांनी अद्यापही पिस्तूल त्या नाल्यातून बाहेर काढली नाही. ज्या ठिकाणी आरोपीने ती फेकली होती. संशयीत आरोपीकडून रक्ताने माखलेले कपडे जप्त करण्यात आले आहेत. 'डॉन' या प्रसिद्ध वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, लाहोरमध्ये ऑनलाईन गेम खेळण्याच्या व्यसनातून घडलेला हा चौथा गुन्हा आहे. पहिली घटना 2020 मध्ये घडली होती.