PUBG (Photo Credits: PUBG)

भारतात सरकारने चीनी अॅपसह पबजी खेळावर बंदी घातली गेली होती. या गेममुळे आतापर्यंत काही जणांनी आपला जीव सुद्धा गमावल्याच्या घटना समोर आल्या आहेत. अशातच आता महाराष्ट्रातील जळगाव येथील एका 20 वर्षीय तरुणीने पबजी गेमच्या नादात आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. नम्रता खोडके असे तरुणीचे नाव असून ती इयत्ता बारावी मध्ये शिकत होती. आत्महत्या करण्यापूर्वी तरुणीची सुसाइड नोट सुद्धा सापडल्याचे बोलले जात आहे.(Latur Shocking: लातूर येथील खळबळजनक घटना! आर्थिक संकटाला वैतागून वृद्ध महिलेची हत्या, एकास अटक)

प्राप्त झालेल्या माहितीनुसार, ही घटना जामनेर परिसरात घडली आहे. नम्रता हिने पबजी गेम खेळाच्या नादात आपला जीव गमावला आहे. या घटनेमुळे नम्रता हिच्या घरातल्यांना धक्का बसला आहे. नम्रता हिचे वडिल एका खासगी डॉक्टरांकडे सहाय्यक डॉक्टर म्हणून काम करतात.

तर नम्रता हिने राहत्या गळात गळफास लावत आत्महत्या केली. तिला रुग्णालयात नेले असता तेथे तिला मृत घोषित केले. त्याचसोबत मोबाइल बंद असल्याने अधिक माहिती मिळालेली नसल्याचे ही सांगण्यात आले आहे. या प्रकरणी अधिक पोलिसांकडून अधिक तपास केला जात आहे. मोबाइल सुरु झाल्यानंतर अधिक माहिती समोर येईल.(Nagpur Gang Rape: नागपूर मध्ये अल्पवयीन मुलीवरील सामूहिक बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून चार आरोपींना अटक तर तीन संशयित जण फरार)

दरम्यान, नम्रता हिने लिहिलेल्या सुसाइट नोटमध्ये असे म्हटले की, माझ्या मृत्यूसाठी कोणालाही जबाबदार ठरवू नये. तर पबजी गेममुळे गेल्या काही काळात घटना सुद्धा वाढल्याने मुलांच्या पालकांनी यावर संताप ही व्यक्त केला होता. पण आता नव्याने लॉन्च झालेल्या पजबी बॅटल ग्राउंड गेमसाठी 18 वर्षाखालील मुलांना आपल्या पालकांचा मोबाइल क्रमांक देणे अनिवार्य करण्यात आले आहे.