Latur Shocking: लातूर येथील खळबळजनक घटना! आर्थिक संकटाला वैतागून वृद्ध महिलेची हत्या, एकास अटक
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: PTI)

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेकांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. याच संकटाला वैतागून लातूर (Latur)  येथील एका व्यक्तीने 80 वर्षांच्या महिलेची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एवढेच नव्हेतर, तिची हत्या केल्यानंतर आरोपीने तिच्या दोन सोनसाखळ्या घेऊन पळून गेला. ही घटना बुधवारी (6 ऑक्टोबर) घडली आहे. त्यानंतर पोलिसांनी शनिवारी (9 ऑक्टोबर) पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली आहे. याप्रकरणी निलंगा पोलीस अधिक चौकशी करीत आहेत.

संदीप आनंद भोसले असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी हा गेल्या काही दिवसांपासून मृत महिलेवर नजर ठेवून होता. दरम्यान, बुधवारी ही महिला शेतात एकटी काम करीत असल्याचे पाहून आरोपीने धारदार शस्त्राने त िचा गळा चिरला. तसेच तिच्या गळ्यात असलेल्या दोन सोनसाखळी घेऊन पळून गेला. महिलेच्या मुलाच्या तक्रारीवरून पोलिसांनी एका अज्ञात व्यक्तीविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम 302 अंतर्गत गुन्हा दाखल केला. हे देखील वाचा- Pushpak Express Rape Case: लखनौ-मुंबई पुष्पक एक्सप्रेस चोरी-बलात्कार प्रकरणी आणखी दोन आरोपींना अटक

एका गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपीला शनिवारी गावातून अटक केली. अधिकाऱ्याने सांगितले की, चौकशी दरम्यान आरोपीने पोलिसांना सांगितले की त्याला आर्थिक अडचणी येत आहेत, म्हणून त्याने महिलेचा हत्या केली आणि तिचे दागिने लुटले.