Pushpak Express Rape Case: लखनौ-मुंबई पुष्पक एक्सप्रेस चोरी-बलात्कार प्रकरणी आणखी दोन आरोपींना अटक
Arrest | Representational Image | (Photo Credits: stux/Pixabay)

Pushpak Express Rape Case: लखनौ-मुंबई पुष्पक एक्सप्रेस चोरी आणि बलात्कार प्रकरणी कल्याण मधील जीआरपी यांच्याकडून आणखी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. धनंजय भगत (18) आणि आकाश सोन्होरे (19) अशी दोन आरोपींची नावे आहेत. चार आरोपींना लवकरच अटक केली जाणार असून पाचव्या आरोपीला शनिवारी ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणी आतापर्यंत सात जणांना अटक करण्यात आली आहे. तर पळ काढलेल्या आणखी एका आरोपीचा शोध घेतला जात आहे.

शुक्रवारी संध्याकाळी आरोपी लखनौ-मुंबई पुष्पक एक्सप्रेस ट्रेन मधून इगतपूरी येथे होता. तेथे त्याने 15 जणांना चाकू, बेल्ट आणि ब्लेडचा धाक दाखवत त्यांच्याकडून चोरी केली. काही आरोपींनी पीडित महिलेचे लैंगिक शोषण ही केले. ऐवढेच नव्हे तर महिलेच्या नवऱ्याला सुद्धा आरोपींनी मारहाण केली. या प्रकारावर अन्य आरोपींनी सुद्धा त्याच्या कृ्त्याचा विरोध केला. त्याला त्याने रेल्वेच्या बाहेर ढकलण्याचा सुद्धा प्रयत्न केला. परंतु प्रवाशांनी रेल्वेचे चैन खेचत ती थांबवली.(Pushpak Express Gangrape Case: लखनौ-मुंबई पुष्पक एक्स्प्रेसमध्ये महिलेवर सामुहिक बलात्कार, 4 जणांना अटक)

शासकीय रेल्वे पोलीस (GRP) च्या मते, आरोपींनी त्या महिलेवर अर्ध्या तासापेक्षा जास्त काळ बलात्कार केला. तोपर्यंत ट्रेन कसारा स्थानकावर पोहचली होती. जिथे प्रवाशांनी आरडाओरडा करण्यास सुरूवात केली. जीआरपीने दोघा आरोपींना कसारा येथे अटक केली गेली.