उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) लखनौ (Lucknow) येथून महाराष्ट्राच्या मुंबईकडे (Mumbai) जाणाऱ्या ट्रेनमध्ये एका महिलेवर आठ जणांनी सामूहिक बलात्कार (Pushpak Express Gangrape) केल्याची घटना घडली आहे. मुंबईला जाणाऱ्या पुष्पक एक्स्प्रेसमध्ये 31 वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली चार जणांना अटक (Arrest) करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी शनिवारी दिली आहे. इतर चार आरोपींचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. लखनऊ-मुंबई जाणाऱ्या पुष्पक एक्स्प्रेसमध्ये इगतपुरी स्थानकातून (Igatpuri station) बाहेर पडल्यावर हा घृणास्पद गुन्हा घडला आहे. जे तांत्रिक थांबा स्टेशन असल्याचे सांगितले जाते. पोलिसांनी अटक केलेल्यांकडून 34,000 रुपये किंमतीचा चोरीचा माल जप्त केला. सरकारी रेल्वे पोलिसांनी बलात्कार आणि दरोड्याचा गुन्हा दाखल केला आहे.
पुष्पक ट्रेनच्या एका डब्यात आठ जणांनी जबरदस्तीने प्रवेश केला आणि प्रवाशांना लुटण्यास सुरुवात केली, असे अहवाल सांगतात. आठ आरोपींनी त्यांच्यासोबत चाकू घेऊन 20 प्रवाशांची लूट केल्याचा आरोप आहे. या प्रक्रियेत किमान पाच प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. यानंतर आठ आरोपींनी 30 वर्षीय एका महिलेवर हल्ला केला. तसेच तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आले आहेत.
Maharashtra | Four persons arrested for alleged gangrape with a woman onboard Lucknow-Mumbai Pushpak Express, search underway for four other accused; further investigation underway
— ANI (@ANI) October 9, 2021
शासकीय रेल्वे पोलीस (GRP) च्या मते, आरोपींनी त्या महिलेवर अर्ध्या तासापेक्षा जास्त काळ बलात्कार केला. तोपर्यंत ट्रेन कसारा स्थानकावर पोहचली होती. जिथे प्रवाशांनी आरडाओरडा करण्यास सुरूवात केली. जीआरपीने दोघा आरोपींना कसारा येथे अटक केली आहे. तर इतर दोघांना रात्री उशिरा अटक करण्यात आली. या प्रकरणातील चार आरोपी फरार आहेत. अधिकाऱ्यांनी असेही उघड केले की या आरोपींनी यापूर्वी असाच गुन्हा केला आहे, की नाही हे शोधण्यासाठी ते आरोपींच्या पार्श्वभूमीची चौकशी करत आहेत.