टेलीग्राम (Telegram) कंपनीचे अब्जाधीश संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पावेल दुरोव (Pavel Durov) यांना पॅरिसच्या उत्तरेकडील ले बोर्जेट विमानतळावर फ्रेंच अधिकाऱ्यांनी अटक (Paris Arrest) केली. फ्रेंच मीडियाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 39 वर्षीय टेक उद्योजकाला त्याच्या खाजगी जेटवर आल्यावर ताब्यात घेण्यात आले. टेलिग्राम प्लॅटफॉर्मशी संबंधित कथित गुन्ह्यांसंदर्भात (Criminal Investigation) जारी केलेल्या वॉरंटशी दुरोवच्या अटकेचा संबंध असल्याची पुष्टी अधिकाऱ्यांनी केली आहे. मात्र, या गुन्ह्यांचे नेमके स्वरूप अद्याप समोर आलेले नाही.
पावेल दुरोव: जगभरातील मोजक्या श्रीमंतांपैकी एक
फ्रान्समधील रशियन दूतावासाने या बातमीला त्वरीत प्रतिसाद दिला आहे. रशियाच्या TASS राज्य वृत्तसंस्थेने म्हटले आहे की, राजनयिक अधिकारी परिस्थितीबद्दल अधिक माहिती गोळा करण्यासाठी माहिती घेत आहेत आणि आवश्यक बाबींची पूर्तता करत आहेत. पावेल दुरोव हे जगभरातील श्रीमंतांपैकी एक आहेत. फर्ब्सने अलिकडेच जाहीर केलेली त्यांची एकूण संपत्ती अंदाजे $15.5 अब्ज इतकी आहे. पावेल दुरोव हे कथितरित्या अझरबैजानमधून प्रवास करत असताना त्यांना स्थानिक वेळेनुसार रात्री 8:00 च्या सुमारास ताब्यात घेण्यात आले. ही अटक फ्रान्समध्ये सुरू असलेल्या प्राथमिक तपासाशी संबंधित आहे. जे टेलीग्रामच्या कथित सामग्रीचे योग्य प्रमाणात नियंत्रण करण्यात अयशस्वी झाल्याबद्दल असल्याचे सांगितले जात आहे. फ्रेंच अधिकाऱ्यां म्हणने आहे की, टेलीग्रामवरील सामग्री नियंत्रणाच्या अभावामुळे प्लॅटफॉर्मवर गुन्हेगारी कृती आणि कारवाया वाढू शकतात. (हेही वाच, 100 Biological Kids: 'मला 100 पेक्षा जास्त जैविक मुले आहेत'; Telegram चा सीइओ Pavel Durov चा धक्कादायक खुलासा)
रशिया-युक्रेन युद्धात टेलीग्राम अॅप महत्त्वाचा घटक
टेलीग्राम अॅपचे जगभरात सुमारे 900 दशलक्ष सक्रिय वापरकर्ते आहेत. हे वापरकर्ते जागतिक संप्रेषणातील प्रमुख सहभागीदार आहेत. विशेषतः रशिया, युक्रेन आणि माजी सोव्हिएत देशांमध्ये हे अॅप मोठ्या प्रमाणावर वापरले जाते. भारतात जसे व्हॉट्सअॅप, फेसबूक, लिंक्डीन, एक्स यांसारखी सोशल मीडिया अॅप वापरली जातात. तसेच, टेलिग्राम त्या देशांमध्ये लोकप्रिय आहे. सरकारी अधिकारी आणि नागरिक या दोघांनी वापरलेल्या युक्रेनमध्ये सुरू असलेल्या संघर्षाविषयी अस्पष्ट माहितीचा स्रोत म्हणून या प्लॅटफॉर्मला महत्त्व प्राप्त झाले आहे. (हेही वाचा, Telegram EvilVideo Malware Alert: टेलिग्रामवरून चित्रपट-व्हिडिओ डाउनलोड करणे पडू शकते महागात; मोबाईलमध्ये प्रवेश करू शकते 'इव्हलव्हिडिओ' मालवेअर, हॅकर्सपासून रक्षण करण्यासाठी काही टिप्स)
दुरोव हे रशियन वंशाचे उद्योजक असून, सध्या ते दुबईत राहतात. विविध सरकारांच्या दबावाला न जुमानता, टेलीग्राम हे "तटस्थ व्यासपीठ" राहिले पाहिजे आणि भू-राजकीय घडामोडींमध्ये सहभागी होऊ नये, असे ते सातत्याने सांगतात. दुरोवच्या अटकेच्या वृत्ताने तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. फ्रान्समधील रशियन दूतावासाने TASS ला सांगितले की ते परिस्थिती स्पष्ट करण्यासाठी "तत्काळ" पावले उचलत आहेत. दरम्यान, काही रशियन राजकारणी आणि मुत्सद्दींनी फ्रान्सच्या कृतींवर टीका केली आहे आणि सोशल मीडियावर प्रसारित झालेल्या फ्रेंच दूतावासांमध्ये निषेधाचे आवाहन केले आहे.
दरम्यान, दुरोव यांच्या अटकेबाबत टेलीग्रामकडून कोणतीही प्रतिक्रिया आली नाही. शिवाय आंतरिक मंत्रालय आणि पोलिसांसह फ्रेंच अधिका्यांनी या अहवालांवर भाष्य करण्यास नकार दिला आहे. अधिक तपशिलाची प्रतिक्षा आहे.