Pakistani Passport Remains Fourth-Worst in the World : पाकिस्तानी पासपोर्ट हा जगातील चौथा सर्वात खराब पासपोर्ट आहे. एक वर्षापूर्वीही पाकिस्तानचे पासपोर्ट याच स्थानावर होते. पाकिस्तानचे पासपोर्ट असल्यास जगात केवळ 32 ठिकाणी पूर्व विजा न घेता प्रवेश मिळतो. 2022 च्या हेन्ली पासपोर्ट इंडेक्सनुसार, स्थानिक मीडिया रिपोर्ट्समध्ये ही माहिती देण्यात आली आहे. डॉनने वृत्त दिले की, हेन्ली पासपोर्ट इंडेक्स हे जगातील सर्व 199 पासपोर्टचे रँकिंग करतात. ही रँकिंग इंटरनॅशनल एअर ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या डेटावर आधारित आहे. डॉनच्या वृत्तानुसार, नुकत्याच जाहीर झालेल्या क्रमवारीत पाकिस्तान हा देश सीरिया, इराक आणि अफगाणिस्तान देशाच्या वर आहे. [हे देखील वाचा: श्रीलंकेचे नवे राष्ट्रपती म्हणून Ranil Wickremesinghe यांची निवड]
सर्वोच्च स्थान जपानच्या पासपोर्टला मिळाले आहे, जपानच्या पासपोर्ट धारकांना 193 ठिकाणी पूर्व विजा न घेता प्रवेश मिळतो. जपाननंतर सिंगापूर आणि दक्षिण कोरिया आहेत, त्यांच्या पासपोर्टवर 192 देशात पूर्व विजा न घेता प्रवेश करू शकतो, त्यानंतर जर्मनी आणि स्पेन आहेत, ज्यांचे पासपोर्टवर 190 देशात पूर्व विजा न घेता प्रवेश केला जाऊ शकतो. त्यानंतर पासपोर्टच्या रँकिंगनुसार युरोपियन राष्ट्रे, युनायटेड स्टेट्स आणि युनायटेड किंगडम यांचा नंबर लागतो. याउलट, अफगाण देशाचे पासपोर्ट धारक फक्त 27 ठिकाणी पूर्व विजा न घेता प्रवेश करू शकता आणि हा सर्वात कमी स्कोअर असलेला पासपोर्ट आहे. इराकी पासपोर्ट धारक केवळ 29 देशांमध्ये आणि सीरियन पासपोर्टसह 30 देशांमध्ये प्रवेश करू शकतात.
आशियातील इतर देशांपैकी, मॉरिशस आणि ताजिकिस्तानसह भारत 87 व्या क्रमांकावर आहे, त्याचे पासपोर्ट 67 देशांमध्ये प्रवेश प्रदान करतात. चीन बोलिव्हियासह 69 व्या क्रमांकावर आहे, त्यांच्या पासपोर्टमुळे 80 ठिकाणी प्रवेश मिळतो. बांग्लादेशचा संबंध असेल तर बांग्लादेश 104 व्या क्रमांकावर आहे. त्यांच्या पासपोर्ट धारकांना 41 देशांमध्ये प्रवेश मिळतो.