
14 फेब्रुवारीला पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या कुरापती सुरुच आहेत. पाकिस्तानी हॅकर्सने 90 भारतीय वेबसाइटवर हल्ला करत साईट्स हॅक करण्याचा प्रयत्न केला. मात्र पाकिस्तानी हल्लेखोर भारताच्या फायरवॉल्स आणि संरक्षणात्मक उपायांचा भंग करण्यास असमर्थ ठरले. त्यामुळे पाकिस्तानचा हा प्रयत्न पुरता फसला.
पुलवामा हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानच्या 200 वेबसाईट्स हॅक केल्याचे वृत्त होते. टीम आय क्रु (Team I Crew) यांनी या वेबसाईट्स हॅक केल्या असून त्याची यादी सोशल मीडियावर शेअर केली होती. या साईट हॅक केल्यानंतर हॅकर्सने साईटवर पाकिस्तानसाठी एक खास मेसेज लिहिला होता. "आम्ही #14/2/2019 हा दिवस कधीच विसणार नाही", असा संदेश या साईट्सवर दिसत होता.
14 फेब्रुवारीला झालेल्या दहशतवादी हल्ल्यात CRPF चे 40 जवान शहीद झाले. या हल्ल्याचे चोख उत्तर देण्यासाठी 26 फेब्रुवारीला भारताने पाकिस्तानवर एअर स्ट्राईक केलं. यात दहशतवादी संघटनांची मुख्य तळं उद्धवस्त करण्यात आली.